Kajol : शाहरूख खान व अजय देवगण यांच्यात काय फरक आहे? काजोलचं उत्तर ऐकून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 17:58 IST2022-12-08T17:57:25+5:302022-12-08T17:58:14+5:30
Kajol : अजय काजोलचा पती आणि शाहरूख जवळचा जीवाभावाचा मित्र,अशा परिस्थितीत या प्रश्नाचं उत्तर देणं जरा कठीण. पण काजोलने अगदी सहज उत्तर दिलं...

Kajol : शाहरूख खान व अजय देवगण यांच्यात काय फरक आहे? काजोलचं उत्तर ऐकून थक्क व्हाल
Kajol on SRK Ajay Devgn Difference: काजोल (Kajol ) सध्या ‘सलाम वेन्की’ या आपल्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. प्रमोशनदरम्यान काजोलच्या मुलाखतींचा धडाका सुरू आहे. सध्या तिच्या एका ताज्या मुलाखतीची चर्चा आहे. होय, या मुलाखतीत काजोलला खरं तर एक ‘धर्मसंकटात’ टाकणारा प्रश्न विचारला गेला. पण काजोलने अगदी सहज यांचं उत्तर दिलं.
एका यु ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत काजोल अगदी बिनधास्त बोलली. अजय देवगण ( Ajay Devgn) आणि शाहरूख खान ( Shah Rukh Khan) यांच्यात काय फरक आहे? असा सवाल तिला विचारण्यात आला. अजय काजोलचा पती आणि शाहरूख जवळचा जीवाभावाचा मित्र,अशा परिस्थितीत या प्रश्नाचं उत्तर देणं जरा कठीण. पण काजोलने अगदी सहज उत्तर दिलं.
काय म्हणाली काजोल...
शाहरूख खान व अजय देवगण या दोघांत काय फरक आहे? असा प्रश्न काजोलला विचारला गेला. यावर या प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्प आहे, असं ती म्हणाली. ती म्हणाली, ‘शाहरूख आणि अजय दोघंही टॅलेंटेड आहेत, दोघंही प्रचंड मेहनत करतात. पण कदाचित लोकांना शाहरूखची मेहनत दिसत नाही. याऊलट अजयची मेहनत सर्वांना दिसते.’
पुढे ती म्हणाली, ‘शाहरूखला माहितीये की तो कोण आहे. तो 24 तास काम करत असतो. तो स्वतपुरता राहतो. परंतु, काळासोबत आणि प्रेक्षकांच्या आवडीनुसार बदलणं त्याला चांगलंच जमतं. एकदा त्याच्या वाढदिवशी मी त्याला कॉल केला. मी तुझ्या घरी येतेय, असं मी त्याला म्हणाले. यावर, ये... ये... पण आजचा दिवस भेटण्यासाठी ठीक नाही, असं तो म्हणाला. का? असं मी विचारलं. यावर, आज मला बाहेर जायचंय, घराबाहेर जमलेल्या लोकांना भेटायचं आहे आणि मुलाखतही द्यायची आहे. माझा वाढदिवस आता माझा राहिलेला नाही. आता मी या लोकांचा आहे. माझा वाढदिवस आता यांचा वाढदिवस आहे,’असं तो म्हणाला. त्याची ती गोष्ट ऐकून मला त्याचं कौतुक वाटलं.