आता कशी दिसते DDLJ तील काजोलची बहिण छुटकी? फोटो पाहून व्हाल चकीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 12:26 IST2018-08-06T12:13:30+5:302018-08-06T12:26:07+5:30

भारतीय सिनेमातील हा पहिला सिनेमा होता जो इतके आठवडे लावला गेला. १९९५ मध्ये आलेल्या या सिनेमाने शाहरुख आणि काजोल दोघांनाही यशाच्या सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवलं.  

Kajol sister chutki Aka Pooja Ruaprel in DDLJ recent pictures | आता कशी दिसते DDLJ तील काजोलची बहिण छुटकी? फोटो पाहून व्हाल चकीत!

आता कशी दिसते DDLJ तील काजोलची बहिण छुटकी? फोटो पाहून व्हाल चकीत!

मुंबई  : शाहरुख खान आणि काजोलचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'ने मुंबईच्या मराठा मंदिर सिनेमागृहात १००० आठवडे पूर्ण केले होते. भारतीय सिनेमातील हा पहिला सिनेमा होता जो इतके आठवडे लावला गेला. १९९५ मध्ये आलेल्या या सिनेमाने शाहरुख आणि काजोल दोघांनाही यशाच्या सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवलं.  

या सिनेमातील इतरही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. मग ती मंदिरा बेदीची भूमिका असो, फरीदा जलाल यांची असो वा अमरिश पुरी यांची असो. यात आणखी एक भूमिका कुणी विसरु शकणार नाही. ती म्हणजे काजोलच्या लहान बहिणीची भूमिका. ही भूमिका फारच गाजली होती. ही भूमिका साकारली होती. पूजा रुपारेलने. या सिनेमात तीने छुटकीची भूमिका साकारली होती. 

पूजाने साकारलेली छुटकीची भूमिकाही अनेकांना रिलेट करत होती. तिच्यातील भाबडेपणा, अल्लडपणा प्रेक्षकांना सुखावून गेला होता. पण पूजा या सिनेमानंतर एकाएकी इंडस्ट्रीतून गायब झाली. पूजा पुन्हा कुठेही दिसली नाही. त्यामुळे ती नेमकी कुठे आहे? काय करतेय ? आता ती कशी दिसते? असे प्रश्न तिच्या चाहत्यांना पडत असतील. पूजा या सिनेमानंतर तब्बल १० वर्ष लाइमलाइटपासून दूर होती. त्यानंतर तिने २०१५ मध्ये  X: Past Is Present मध्ये काम केलं होतं. 

(Image Credit: www.filmibeat.com)

लग्नासाठी प्रपोजल

DDLJ सुपरहिट झाल्यावर पूजाची एक मुलाखत आली होती. यात पूजाने सांगितले होते की, '१९९५ मध्ये मी शाळेत होते. माझी डेब्यू फिल्म किंग अंकल होती. DDLJ नंतर तर माझा मेल बॉक्स फॅन्सच्या मेसेजेसनी भरलेला असायचा. जगभरातून लोक मला मेल करतात. मला लग्नासाठीही अनेक प्रपोजल आले होते'.

कसा मिळाला होता सिनेमा?

पूजाने सांगितले होते की, 'मी एके ठिकाणी ऑडिशनसाठी गेले होते. तिथेही एका व्यक्तीने माझ्यावर क्रश असल्याचं सांगितलं होतं. DDLJ नंतर त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं. मला सिनेमात फार इंटरेस्ट नव्हता. मी या सिनेमासाठी ऑडिशनही दिलं नव्हतं. मला यशराज फिल्ममधून फोन आला आणि मी त्यांना भेटायला गेले'.

तिने सांगितले की, 'त्यांनी काजोलसोबत माझं फोटो सेशन केलं. त्यांना मी तिची बहिण दिसते का हे बघायचं होतं. मी मंदिरा बेदीसोबत रुम शेअर केली होती. मंदिराचा हा पहिला सिनेमा होता. तिच्यासोबत नंतर मी २४ मध्ये काम केलं. मला नव्हतं माहीत की, DDLJ इतका हिट होईल. 

आता पूजा ३५ वर्षांची झाली असून पूजाने टीव्ही शो २४ सोबतच २०१६ मध्ये 'पेला आधी अक्षर' या गुजराती सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणूनही काम केलं होतं. त्यासोबतच पूजा तिच्या स्टॅंड अप कॉमेडी शोची मार्केटिंगही करते. तसेच ती स्क्रीप्ट रायटिंगही करते. 
 

Web Title: Kajol sister chutki Aka Pooja Ruaprel in DDLJ recent pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.