काजोलची लेक न्यासा लवकरच फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार? मनीष मल्होत्राने दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:43 IST2025-04-29T15:42:27+5:302025-04-29T15:43:23+5:30

न्यासासाठी मनीष मल्होत्राची पोस्ट, नेटकऱ्यांनी केलं जबरदस्त ट्रोल

Kajol s daughter Nysa devgan to make her debut in the film industry soon Manish Malhotra gives a hint | काजोलची लेक न्यासा लवकरच फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार? मनीष मल्होत्राने दिली हिंट

काजोलची लेक न्यासा लवकरच फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार? मनीष मल्होत्राने दिली हिंट

अजय देवगण (Ajay Devgan) आणि काजोलची (Kajol) मुलगी न्यासा देवगण (Nysa Devgan) कायम चर्चेत असते. न्यासाचा मध्यंतरी तिच्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत होती. सुरुवातीला सावळी दिसणारी न्यासा अचानक गोरी दिसू लागल्याने तिला ट्रोल करण्यात आलं होतं. न्यासा २२ वर्षांची आहे. अनेकदा तिचे नशेतील व्हिडिओही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पापाराझींसमोर न्यासा अडखळत चालताना दिसली आहे. दरम्यान न्यासा लवकरच बॉलिवूड डेब्यू करण्याची शक्यता आहे. सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्रानेच तशी हिंट दिली आहे.

न्यासा देवगण सध्या लहान असून ती इतक्यात सिनेमांमध्ये येणार नाही असं अभिनेत्री काजोल लेकीबद्दल म्हणाली होती. न्यासाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी पारंपरिक तर कधी वेस्टर्न लूकमध्ये ती दिसते. नुकतंच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने तिचा लेहेंग्यातील फोटो पोस्ट केला आहे. शिमरी अबोली रंगाच्या लेहेंग्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. मनीषने यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले, "सिनेमा तुझी वाट पाहत आहे न्यासा."


मनीषच्या या पोस्टवर काजोलनेही हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत. त्यामुळे न्यासा खरोखरंच पदार्पण करणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दुसरीकडे नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोलच केलं आहे. 'माहित नाही का ही नशेतच दिसते','कृपया नको, आणखी एक फ्लॉप स्टारकिड येत आहे','प्लास्टिक सर्जरीने हिचा सगळा लूकच बदलला आहे','किती ते एडिटिंग केलंय' अशा कमेंट्स मनीषच्या पोस्टवर आल्या आहेत.

Web Title: Kajol s daughter Nysa devgan to make her debut in the film industry soon Manish Malhotra gives a hint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.