"शारिरीक शोषण दाखवणारे सीन्स करत नाही" काजोलचा खुलासा, म्हणाली, 'स्वत:ला सिद्ध...'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 09:16 AM2023-12-14T09:16:52+5:302023-12-14T09:18:26+5:30

प्रतिभाशाली अभिनेत्री काजोलने भूमिकांच्या निवडीबद्दल खुलासा केला आहे.

Kajol reveals she never do scenes of physical abuse says she can prove her in different ways | "शारिरीक शोषण दाखवणारे सीन्स करत नाही" काजोलचा खुलासा, म्हणाली, 'स्वत:ला सिद्ध...'

"शारिरीक शोषण दाखवणारे सीन्स करत नाही" काजोलचा खुलासा, म्हणाली, 'स्वत:ला सिद्ध...'

आपल्या बडबड्या स्वभावामुळे आणि दमदार अभिनयामुळे सर्वांनाच प्रेमात पाडणारी अभिनेत्री काजोल (Kajol) अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत काम करत आहे. ९० च्या दशकात तिच्या सिनेमांना प्रेक्षक अक्षरश: डोक्यावर घ्यायचे. आता ती मोजकेच प्रोजेक्ट्स घेत असली तरी ते देखील हिट असतात. नुकतंच काजोलने शारिरीक शोषण असलेले सीन्स कधीच करत नाही असा खुलासा केला आहे. हे सीन्स त्रासदायक असतात असंही ती म्हणाली.

नेटफ्लिक्स इंडिया अॅक्टर्स राऊंडटेबलमध्ये काजोल सहभागी झाली होती. यावेळी ती म्हणाली, 'मी आधीपासूनच हे ठरवलं होतं की मी शारिरीक शोषण दाखवणारे सीन्स करणार नाही. माझी छेड काढणारे किंवा असे सीन्स ज्यामध्ये मी कंफर्टेबल नाही. कारण मला वाटतं एक कलाकार म्हणून जेव्हा आम्ही शूट करतो तेव्हा आम्ही ती भूमिका जगत असतो. म्हणूनच जर त्या सीन्सबद्दल आपण प्रामाणिक नसू तर कॅमेरा सहजपणे ती गोष्ट पकडतो. यासाठी कॅमेऱ्यासमोर प्रामाणिक असणं गरजेचं असतं.'

ती पुढे म्हणाली, 'मी शारिरीक किंवा लैंगिक शोषण असणाऱ्या सीन्समध्ये कंफर्टेबल नसते. कारण ते खूप त्रासदायक असतात आणि मला नाही वाटत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मला अशा प्रकारचे सीन्स करण्याची गरज आहे. मी इतर १०० प्रकारे ते सिद्ध करुच शकते.'

काजोल सध्या मोठ्या पडद्यासोबतच ओटीटीवर लोकप्रिय होत आहे. तिने नुकताच 'द लस्ट स्टोरीज 2' सिनेमा केला जो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. तसंच नेटफ्लिक्सवरच तिची वेब सिरीज 'द ट्रायल' सुपरहिट झाली. लवकरच ती क्रिती सेननसोबत 'दो पत्ती' मध्ये दिसणार आहे.

Web Title: Kajol reveals she never do scenes of physical abuse says she can prove her in different ways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.