'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्यानंतर काजोलची पोस्ट, व्यक्त केला अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 10:12 IST2025-08-06T10:10:17+5:302025-08-06T10:12:16+5:30

"माझी आई ज्या मंचावर चालली, त्याच..." राज कपूर विशेष योगदान पुरस्कार स्विकारल्यानंतर काजोल झाली भावूक

Kajol Expressed Pride Emotional Post Maharashtra State Film Awards | 'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्यानंतर काजोलची पोस्ट, व्यक्त केला अभिमान

'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्यानंतर काजोलची पोस्ट, व्यक्त केला अभिमान

Kajol Maharashtra State Film Awards: 'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळा काल ५ ऑगस्ट २०२५ रोजी मंगळवार मुंबईत पार पडला. अभिनेत्री काजोलला इंडस्ट्रीतील तिच्या योगदानाबद्दल स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं गौरवण्यात आलं. विशेष म्हणजे काल काजोल हिनं ५१ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी तिला प्रतिष्ठित पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि सहा लाख रुपये रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं. आपल्या लाडक्या लेकीला पुरस्कार स्विकारताना पाहण्यासाठी अभिनेत्री तनुजाही राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होत्या. काजोलनं या सोहळ्यासाठी तिच्या आईची खास साडी नेसली होती. मुळातच आईच्या पावलावर पाऊल टाकत इंडस्ट्रीत आलेल्या काजोलनं पुरस्कार स्विकारल्यानंतर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

काजोलने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली. त्यात तिने लिहिलं, "माझी आई एकदा ज्या मंचावर चालत होती, त्याच मंचावर चालताना आणि तेही माझ्या वाढदिवशी... असं वाटतं की हे विश्व मला आठवण करून देत आहे की मी कुठून आले आहे... आणि मी नेहमी माझ्यासोबत कोणाला घेऊन जाते". या पोस्टसोबत तिने पुरस्कार स्वीकारतानाचे आणि स्टेजवरील खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ ही शेअर केले. तिच्या या पोस्टला सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा मिळत आहेत.


अभिनेत्री काजोल गेल्या ३३ वर्षांपासून हिंदी मनोरंजनविश्वात कार्यरत आहे. आपल्या करिअरमध्ये तिने आजपर्यंत २०० हून अधिक सिनेमे केले. बेखुदी, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, गुप्त, कभी खुशी कभी गम, अशा कित्येक सिनेमांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तिच्या अभिनयाची आजही प्रेक्षकांवर जादू आहे. १९९२ साली आलेल्या 'बेखुदी'मधून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. काजोलला मनोरंजनविश्वात ३३ वर्ष पूर्ण झाली आहेत. आजही ती त्याच जोशात, तिच्या स्टाईलमध्ये ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन प्रेक्षकांचं मनोरजन करत आहे. २०११ साली काजोलला पद्मश्री पुरस्कारही मिळालेला आहे. 

Web Title: Kajol Expressed Pride Emotional Post Maharashtra State Film Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.