'चंदू चॅम्पियन'सोबत पुन्हा काम करणार कबीर खान, आगामी सिनेमात कार्तिक आर्यनची वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 15:59 IST2025-10-28T15:59:33+5:302025-10-28T15:59:50+5:30
कबीर खान आणि कार्तिक आर्यनचा आगामी सिनेमा कशावर आधारित आहे?

'चंदू चॅम्पियन'सोबत पुन्हा काम करणार कबीर खान, आगामी सिनेमात कार्तिक आर्यनची वर्णी
कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅम्पियन' सिनेमात कार्तिक आर्यनने भूमिका साकारली होती. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं. कबीर खान-कार्तिक आर्यन ही दिग्दर्शक-अभिनेत्याची जोडी हिट झाली. कार्तिक आर्यनच्या कामाचं कौतुक झालं. आता कार्तिक पुन्हा कबीर खानसोबत काम करण्यास सज्ज आहे. कबीर खानच्या आगामी सिनेमात कार्तिकची वर्णी लागली आहे.
बॉलिवूड हंगामा रिपोर्टनुसार, कबीर खान आपल्या प्रत्येक सिनेमातून काही ना काही वेगळं आणत असतो. त्याचा पुढचा सिनेमा हा सत्य घटनेवर आधारित आहे. यातील मुख्य भूमिकेसाठी कार्तिक आर्यन एकदम योग्य अभिनेता आहे. दोघंही प्रेक्षकांना पुन्हा एक अद्भूत सिनेमॅटिक अनुभव देण्याच्या तयारित आहेत. या वेळीही सिनेमा खेळावर आधारित आहे. तसंच हा सिनेमा कार्तिक आर्यनच्या करिअरमधला सर्वात बिग बजेट सिनेमा असू शकतो. कार्तिकचा एकंदर करिअर ग्राफ पाहता या सिनेमावर १५० कोटी खर्च होण्याची शक्यता आहे.
कार्तिक आणि कबीर खान लवकरच या सिनेमाची घोषणा करतील असा अंदाज आहे. सिनेमाचं प्री प्रोडक्शन काम सुरु होणार आहे. याशिवाय १ नोव्हेंबरपासून कार्तिक 'नागजिला' या सिनेमाचं शूटिंग सुरु करणार आहे.
सध्या बीटाऊनमध्ये अनीस बज्मी यांच्या एका सिनेमावरुन तीन अभिनेत्यांमध्ये स्पर्धा लागल्याची चर्चा आहे. रणबीर कपूर, रणवीर सिंह आणि कार्तिक आर्यन या तिघांपैकी एकाची बज्मींच्या सिनेमात वर्णी लागणार आहे.