दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला निमंत्रण दिले जाणार इतक्याच लोकांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 10:42 IST2018-08-14T10:41:07+5:302018-08-14T10:42:38+5:30

दीपिका आणि रणवीर लग्न कधी करणार याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सना गेल्या कित्येक दिवसांपासून लागलेली आहे. त्या दोघांचे लग्न नोव्हेंबरमध्ये असल्याचे म्हटले जात असून या दोघांच्या जवळच्या नातेवाईकांना आणि कुटुंबियांना याविषयी कळवण्यात आलेले आहे.

Just the people who will be invited to Deepika Padukone and Ranveer Singh's wedding | दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला निमंत्रण दिले जाणार इतक्याच लोकांना

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला निमंत्रण दिले जाणार इतक्याच लोकांना

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची तारीख जाहीर झाली असून त्यांच्या लग्नाला केवळ काहीच व्यक्तींना आमंत्रित केले जाणार आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्न करणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून आहे. दीपिका आणि रणवीर यांच्या नात्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून आहे. पण त्यांनी मीडियामध्ये कधीच त्यांच्या नात्याबद्दल कबुली दिली नाही. ते दोघे जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत घालवताना पाहायला मिळतेच. नुकताच दीपिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो दुसरा कोणीही नाही तर रणवीर सिंगने काढला आहे. 

दीपिका आणि रणवीर लग्न कधी करणार याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सना गेल्या कित्येक दिवसांपासून लागलेली आहे. त्या दोघांचे लग्न नोव्हेंबरमध्ये असल्याचे म्हटले जात असून या दोघांच्या जवळच्या नातेवाईकांना आणि कुटुंबियांना याविषयी कळवण्यात आलेले आहे. त्या दोघांचे लग्न इटलीमधील लोम्बार्डी येथील लेक कोमो येथे होणार आहे. त्यांच्या लग्नाला केवळ ३० लोकच हजेरी लावणार आहेत. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला कोणाकोणाला निमंत्रणं देण्यात आली हे अद्याप कळले नसले तरी बॉलिवूडमधील त्यांच्या जवळचे काही मित्र-मैत्रीण देखील लग्नाला हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे.

दीपिका आणि रणवीर यांचे लग्न कोणत्या तारखेला होणार याबाबत अद्याप तरी कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसली तरी ते दोघे २० नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. रणवीर आणि दीपिका हे बॉलिवूडमधील एक क्यूट कपल मानले जाते. त्यांनी बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले असून त्यांची केमिस्ट्र त्यांच्या फॅन्सना नेहमीच आवडते. 

फ्लोरिडात काही दिवसांपूर्वी रणवीर आणि दीपिका एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवत होते. त्यावेळी रणवीर व दीपिकाने अतिशय गुप्तता पाळून या सुटीचे प्लानिंग केले होते. पण फ्लोरिडाच्या रस्त्यांवर ते एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना दिसले आणि दोघांच्या ‘सीक्रेट हॉलिडे’चे पार बारा वाजले होते. या हॉलिडेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

Web Title: Just the people who will be invited to Deepika Padukone and Ranveer Singh's wedding