थिएटर गाजवणारा 'देवरा' आता पाहायला मिळणार घरबसल्या! 'या' तारखेला, 'या' ओटीटीवर होणार रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 13:12 IST2024-10-20T13:11:33+5:302024-10-20T13:12:29+5:30
ज्यु. एनटीआरचा गाजलेला 'देवरा' सिनेमा या ओटीटीवर तुम्हाला घरबसल्या बघण्याची संधी मिळणार आहे (devara)

थिएटर गाजवणारा 'देवरा' आता पाहायला मिळणार घरबसल्या! 'या' तारखेला, 'या' ओटीटीवर होणार रिलीज
या वर्षात अनेक सिनेमांनी थिएटरमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय. काही सिनेमांनी प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंच शिवाय बॉक्स ऑफिसवरही बक्कळ कमाई केली. यापैकीच एक गाजलेला सिनेमा म्हणजे 'देवरा'. ज्यु. एनटीआरची प्रमुख भूमिका असलेल्या 'देवरा' सिनेमाची चांगलीच चर्चा झाली. 'देवरा' ज्यांना थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांना घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे. 'देवरा' आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज झालाय. त्याविषयी अधिक जाणून घ्या.
'देवरा' या ओटीटीवर होणार रिलीज
ज्यु. एनटीआरचा गाजलेला 'देवरा' सिनेमा आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज झालाय. 'देवरा'चा ८ नोव्हेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाण्याची शक्यता आहे. याविषयी अधिकृत माहिती समोर आली नसली तरीही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 'देवरा' ओटीटीवर रिलीज केला जाऊ शकतो. 'देवरा' सिनेमाने थिएटरमध्ये प्रेक्षकांचं हाऊसफुल्ल प्रेम मिळवलं होतं. परंतु ज्यांना थिएटरमध्ये सिनेमा पाहता आला नाही त्यांना 'देवरा' ओटीटीवर घरबसल्या बघता येणार आहे.
Announcement on the way... 🍿#Devara is coming soon on Netflix in Telugu, Tamil, Malayalam, Kannada, Hindi.#OTT_Trackerspic.twitter.com/KUAMUbF6gN
— OTT Trackers (@OTT_Trackers) October 13, 2024
'देवरा' सिनेमाविषयी थोडंसं
'देवरा' सिनेमात सैफ अली खान आणि ज्युनिअर एटीआर यांची प्रमुख भूमिका होती. याशिवाय सिनेमात जान्हवी कपूर, प्रकाश राज आणि मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेनेही भूमिका साकारली. विशेष म्हणजे या सिनेमात ज्युनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. आता ओटीटी रिलीजमुळे 'देवरा'चा आनंद सर्वांना घेता येईल.