थिएटरमध्ये अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळालेला 'जॉली एलएलबी ३' आता ओटीटीवर होणार रिलीज, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:02 IST2025-10-07T18:01:46+5:302025-10-07T18:02:16+5:30
'जॉली एलएलबी ३' आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तप

थिएटरमध्ये अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळालेला 'जॉली एलएलबी ३' आता ओटीटीवर होणार रिलीज, जाणून घ्या
अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) यांचा बहुचर्चित कोर्टरूम-ड्रामा चित्रपट 'जॉली एलएलबी ३' (Jolly LLB 3) सिनेमाला बॉक्स ऑफिसवर जितकी अपेक्षा होती तितकी चांगली कामगिरी करता आली नाही. १९ सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ओटीटी (OTT) रिलीजची आता चर्चा आहे. जाणून घ्या
ओटीटी रिलीजची तारीख आणि प्लॅटफॉर्म
ओटीटी प्ले (OTT Play) च्या रिपोर्टनुसार, 'जॉली एलएलबी ३' हा चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच १४ नोव्हेंबर २०२५ पासून डिजिटल स्ट्रीमिंगसाठी जिओ+हॉटस्टार आणि नेटफ्लिक्सवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तथापि, निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही थिएटरमध्ये मिळालेल्या कमी प्रतिसादामुळे 'जॉली एलएलबी ३' लवकरच ओटीटीवर रिलीजवर केला जाणार आहे.
चित्रपटाची कमाई
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'जॉली एलएलबी ३' चं बजेट १२० कोटी रुपये आहे. सैकनिल्कनुसार, या चित्रपटाने आतापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर १०८.६५ कोटी रुपये कमवले आहेत. याशिवाय चित्रपटाने जागतिक स्तरावर १५७.७ कोटी रुपये कलेक्शन करत आपले बजेटचे पैसे वसूल केले आहेत. 'जॉली एलएलबी ३' मध्ये अक्षय कुमारने जॉली मिश्रा आणि अर्शद वारसीने जॉली त्यागी ही प्रमुख पात्रं साकारली आहेत. सुभाष कपूर दिग्दर्शित या कॉमेडी-कोर्टरूम-ड्रामामध्ये सौरभ शुक्ला, अमृता राव आणि हुमा कुरेशी यांनीही महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.