शाहरुख खानच्या 'पठान'मधील जॉन अब्राहमचा दमदार लूक आउट, सिद्धार्थ आनंद म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 14:48 IST2022-08-25T14:48:13+5:302022-08-25T14:48:51+5:30
Pathaan Movie : 'पठान' चित्रपटातील शाहरुख खानचा फर्स्ट लूक सोशल मीडियाद्वारे सर्वांपुढे आणला होता, मग दीपिका पादुकोनची झलक दाखवली होती आणि आता जॉन अब्राहमचा सुपर स्लिक अवतार प्रेक्षकांसमोर आणला आहे.

शाहरुख खानच्या 'पठान'मधील जॉन अब्राहमचा दमदार लूक आउट, सिद्धार्थ आनंद म्हणाला...
यशराज फिल्म्स(Yash Raj Films)ची, प्रचंड अपेक्षा असलेली एक मोठी फिल्म बरोबर ५ महिन्यांनी रिलीज होणार आहे आणि ‘पठान’ नावाच्या या सिनेमामधील खलनायकाचा अर्थात जॉन अब्राहम(John Abraham)चा फर्स्ट लूक स्टुडिओने सर्वांपुढे आणला आहे. सिद्धार्थ आनंद(Siddharth Anand)ने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटा संदर्भातील प्रत्येक घोषणेबद्दल निर्मात्यांनी गुप्तता बाळगली आहे आणि लोकांना आश्चर्याचे धक्के दिले आहेत, शाहरुख खान(Shah Rukh Khan)चा फर्स्ट लूक त्यांनी सोशल मीडियाद्वारे सर्वांपुढे आणला होता, मग दीपिका पादुकोनची झलक दाखवली होती आणि आता जॉन अब्राहमचा सुपर स्लिक अवतार सर्वांपुढे आणला आहे. 'पठाण'(Pathaan)बद्दल तुफान चर्चा सुरू आहे आणि चित्रपटाकडून अपेक्षाही खूप आहेत. चित्रपटाची मौल्यवान अंगे थोड्या थोड्या अंतराने सर्वांपुढे आणण्यासाठी, यशराज फिल्म्स आणि सिद्धार्थ, युक्तीने काम करत आहेत.
सिद्धार्थ सांगतो, पठान सिनेमाबाबतची प्रत्येक घोषणा म्हणजे एखाद्या भव्य कोड्याचा एकेक तुकडा, चाहत्यांच्या औत्सुक्याने भरलेल्या डोळ्यांपुढे आणण्यासारखे आहे, रिलीजच्या तारखेपर्यंत हे सुरूच राहणार आहे. 'पठाण'शी संबंधित प्रत्येक गोष्टीवर मोठी चर्चा झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे, कारण, सुदैवाने चर्चा व्हावी असा आशय आमच्याकडे आहे.”
जॉनला खलनायकाच्या भूमिकेत घेण्याच्या निर्णयाबद्दल सिद्धार्थ सांगतो, “जॉन अब्राहम 'दुष्ट' व्यक्तिरेखा साकारत आहे, तो 'पठान'मधील खलनायक आहे. खलनायकाचे प्रस्तुतीकरण हे नायकाहून अधिक मोठे नसले तरी निदान नायकाएवढेच मोठे असले पाहिजे असे मला नेहमीच वाटत आले आहे. खलनायक जबरदस्त असेल, तरच नायकाचा व त्याचा संघर्ष रोमहर्षक होऊ शकतो. आणि शाहरुख खान जेव्हा जॉनशी दोन हात करतो, तेव्हा एक असामान्य झुंज बघायला मिळणारच आहे. आम्हाला जॉनला सुपर स्लिक अवतारात प्रस्तुत करायचे होते.
फर्स्ट लूक्समुळे लोकांना 'पठान'च्या विश्वाबद्दल वाटणारी उत्कंठा शिगेला पोहोचत आहे, असे सिद्धार्थला वाटते. तो सांगतो, “शाहरूख खान, दीपिका पादुकोन आणि आता जॉन यांचे फर्स्ट लूक्स, आम्हाला ज्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांनी ही फिल्म बघायला हवी आहे, त्या दृष्टिकोनाचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करतात. लोकांनी आता कुठे 'पठान'च्या विश्वाची झलक बघितली आहे. हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे आणि प्रेक्षकांना येत्या काही महिन्यांत जी नेत्रदीपक अॅक्शन बघायला मिळणार आहे. पठान चित्रपट २५ जानेवारी, २०२३ रोजी हिंदी, तमीळ व तेलुगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे.