जॉन अब्राहमचा बहुचर्चित 'द डिप्लोमॅट' ओटीटीवर कधी येणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 15:46 IST2025-03-19T15:44:20+5:302025-03-19T15:46:35+5:30

जॉन अब्राहमचा बहुचर्चित 'द डिप्लोमॅट'

John Abraham Starring The Diplomat OTT Release Date & Platform | जॉन अब्राहमचा बहुचर्चित 'द डिप्लोमॅट' ओटीटीवर कधी येणार? जाणून घ्या

जॉन अब्राहमचा बहुचर्चित 'द डिप्लोमॅट' ओटीटीवर कधी येणार? जाणून घ्या

अभिनेता जॉन अब्राहमची (John Abraham)मुख्य भूमिका असलेला 'द डिप्लोमॅट' सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट १४ मार्च २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. भारतीय राजदूत जे. पी. सिंग आणि उज्मा अहमद यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. शिवम नायर दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाला. थिएटरनंतर आता चित्रपटाच्या ओटीटी रिलीजचा मार्ग देखील जवळजवळ निश्चित झाला आहे. 

आजकाल अनेक निर्माते त्यांचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याआधीच त्याचे डिजीटल राइट्स हे विकताना दिसतात. थिएटरनंतर 'द डिप्लोमॅट' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दैनिक जागरणनुसार, हा चित्रपट ९० दिवसांच्या थिएटर रननंतर ओटीटीवर येईल. याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

जॉन अब्राहम हा त्याच्या अ‍ॅक्शन फिल्मसाठी ओळखला जातो. पण, 'द डिप्लोमॅट' या चित्रपटात एका शांत राजदुताच्या भूमिकेत दिसला.  पाकिस्तानात अडकलेल्या मुलीला मायदेशी आणण्याचा थरारक प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आला आहे.  जॉन अब्राहम व्यतिरिक्त, चित्रपटात सादिया खतीब, रेवती, कुमुद मिश्रा आणि शरीब हाश्मी यांच्याही भूमिका आहेत. 
 

Web Title: John Abraham Starring The Diplomat OTT Release Date & Platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.