जॉन अब्राहम भेंडी-वांगे खाऊ शकत नाही, कारण...; अभिनेत्याच्या ट्रेनरचा खुलासा, सांगितलं फिटनेसचं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:54 IST2026-01-20T12:51:00+5:302026-01-20T12:54:52+5:30

साखरेला स्पर्श नाही, भेंडी-वांगे खाणे टाळतो, कारण...; 'असा' आहे जॉन अब्राहमचा डाएट प्लॅन,  ट्रेनरने केला खुलासा 

johan abraham trainer vinod channa reveals her strict diet says actor cant eat bhindi or baingan know the reason | जॉन अब्राहम भेंडी-वांगे खाऊ शकत नाही, कारण...; अभिनेत्याच्या ट्रेनरचा खुलासा, सांगितलं फिटनेसचं गुपित

जॉन अब्राहम भेंडी-वांगे खाऊ शकत नाही, कारण...; अभिनेत्याच्या ट्रेनरचा खुलासा, सांगितलं फिटनेसचं गुपित

John Abraham Fitness Secrest:बॉलिवूडचा 'पोस्टर बॉय' म्हणून अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) ओळखला जातो. वयाची पन्नाशी ओलांडूनही जॉन तरुण कलाकारांपेक्षा फिट अँड फाईन आहे. त्याच्या चित्रपटांपेक्षा फिटनेसचीही चाहत्यांमध्ये तितकीच चर्चा रंगलेली असते. त्याची फिटनेस शैली साधी, नियमित व शिस्तबद्ध आहे. त्यामुळेच चाहते त्याच्या तंदुरुस्तीबद्दलची माहिती घेण्यास कायम उत्सुक असतात.नुकत्याच एका मुलाखतीत सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना यांनी अभिनेत्याचं डाएट आणि फिटनेसचं गुपित उलगडलं आहे.

विनोद चन्ना यांनी आजवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी फिटनेसचे धडे दिले आहेत. अलिकडेच त्यांनी हिंदी रशला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, जॉन अगदी काटेकोरपणे त्याच्या डाएटचं पालन करतो. तो कोणतीही गोड वस्तू खात नाही. मुलाखतीमध्ये विनोद म्हणाले, जर मी त्यांना फक्त चार प्रकारचेच पदार्थ खाण्याचा सल्ला दिला, तर तो फक्त तेच पदार्थ खाईल आणि इतर कोणत्याही गोष्टीला हात लावणार नाहीत.इतका तो त्याचा डाएटबद्दल काटेकोर आहे. 

मग पुढे त्यांनी जॉन अब्राहमच्या एका शूटिंगचा किस्सा शेअर केला. ते म्हणाले,"एका शूटिंग दरम्यान कुठल्यातरी देशाची एक राजकुमारी आली होती, जी जॉनची मैत्रीण होती. जेवणानंतर तिने मला सांगितलं की जॉनने सगळं काही खाल्लं आहे. पण मी तिला म्हटलं मला १०० टक्के खात्री आहे की जॉनने जेवणाला हातही लावला नसेल".

विनोद चन्ना यांच्या मते, जॉन अनेक वर्षांपासून ठराविक आणि कडक डाएटवर आहे. त्यामुळे जर त्याने आता अचानक भेंडी किंवा वांग खाल्लं, तर त्याचे पोट खराब होऊ शकते.

Web Title : जॉन अब्राहम का सख्त आहार: भिंडी और बैंगन की मनाही!

Web Summary : अपनी फिटनेस के लिए मशहूर जॉन अब्राहम सख्त आहार का पालन करते हैं। ट्रेनर विनोद चन्ना ने खुलासा किया कि वे मिठाई से परहेज करते हैं और सीमित भोजन विकल्प का पालन करते हैं। लंबे समय से आहार प्रतिबंधों के कारण भिंडी या बैंगन खाने से उनका सिस्टम खराब हो सकता है।

Web Title : John Abraham's strict diet revealed: No okra or eggplant allowed!

Web Summary : John Abraham, known for his fitness, maintains a strict diet. Trainer Vinod Channa revealed he avoids sweets and adheres to a limited food selection. Eating okra or eggplant could upset his system due to his long-term dietary restrictions.