जया बच्चन यांनी सांगितलं होतं सून ऐश्वर्यासोबत कसं आहे नातं?, म्हणाल्या होत्या - "मला तिची कोणतीच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 16:40 IST2025-03-27T16:39:32+5:302025-03-27T16:40:10+5:30

Jaya Bachchan And Aishwarya Rai Bachchan : एका मुलाखतीत जया बच्चन यांनी त्यांची सून ऐश्वर्या रायसोबतच्या नात्याबद्दल सांगितले होते.

Jaya Bachchan had told how her relationship with daughter-in-law Aishwarya is? She had said - ''I don't have any...'' | जया बच्चन यांनी सांगितलं होतं सून ऐश्वर्यासोबत कसं आहे नातं?, म्हणाल्या होत्या - "मला तिची कोणतीच..."

जया बच्चन यांनी सांगितलं होतं सून ऐश्वर्यासोबत कसं आहे नातं?, म्हणाल्या होत्या - "मला तिची कोणतीच..."

काही दिवसांपासून ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र अभिषेक आणि ऐश्वर्याने यावर्षी अनेक इव्हेंटला एकत्र येऊन घटस्फोटाच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. या सगळ्या चर्चांदरम्यान एकदा जया बच्चन (Jaya Bachchan) यांनीही त्यांची सून ऐश्वर्यासोबतच्या बॉण्डिंगबद्दल बोलले होते.

एकदा रेडिटसोबतच्या संभाषणात जया बच्चन यांनी त्यांची सून ऐश्वर्या रायसोबतच्या नात्याबद्दल सांगितले होते. त्यांनी अभिनेत्रीला त्यांची मैत्रिण म्हणून संबोधले होते आणि म्हणाल्या होत्या की, "ती माझी मैत्रीण आहे. जर मला तिचे म्हणणे पटले नाही, तर मी तिला तोंडावर सांगते. मी तिच्या पाठीमागे राजकारण करत नाही. जर ती माझ्याशी असहमत असेल तर ती स्वतःला व्यक्त करते. फरक एवढाच आहे की मी जरा जास्त ड्रामेटिक होऊ शकते आणि तिला अधिक आदर दाखवावा लागेल. मी वयस्कर आहे, तुम्हाला माहिती आहे. एवढेच आहे."

जया बच्चन यांनी सांगितलं सून ऐश्वर्या रायसोबतच्या नात्याबद्दल
फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी एका मुलाखतीत जया बच्चन यांना विचारले की, त्या आपल्या सुनेशी कठोर वागतात का? यावर त्या म्हणाल्या होत्या की, "कठोर? ती माझी मुलगी नाही! ती माझी सून आहे. मी तिच्याशी कठोर का वागू? मला खात्री आहे की तिच्या आईने तिच्यासाठी असे केले आहे. मुलगी आणि सून यात फरक आहे, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे, आपण आई वडिलांना गृहित धरु शकतो. पण सासू सासऱ्यांच्या बाबतीत असे करता येत नाही."

अमिताभ बच्चन यांना सून ऐश्वर्याबद्दल काय वाटते?
'कॉफी विथ करण'मधील बातचीतमध्ये जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या सुनेबद्दल काय वाटते हेदेखील सांगितले होते. ते म्हणाले होते, "अमितजी, तिला पाहताच जणू श्वेता घरी येत आहे. श्वेता सोडून गेलेली पोकळी ती भरून काढते आहे. श्वेता कुटुंबात नाही, ती बाहेरची आहे आणि ती बच्चन नाही हे आम्ही कधीच जुळवून घेऊ शकलो नाही. हे अवघड आहे."

Web Title: Jaya Bachchan had told how her relationship with daughter-in-law Aishwarya is? She had said - ''I don't have any...''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.