महिलांच्या ड्रेसिंंग स्टाईलवर बोलल्या जया बच्चन, पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 16:55 IST2022-11-20T16:51:55+5:302022-11-20T16:55:51+5:30

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. सध्या त्यांच्या नातीचा म्हणजेच नव्या नवेली नंदाचा What the hell Navya 'व्हॉट द हेल नव्या' हा पॉडकास्ट गाजतोय.

jaya-bachchan-asked-nowadyas-women-feel-powerful-in-western-clothes-only-why-so | महिलांच्या ड्रेसिंंग स्टाईलवर बोलल्या जया बच्चन, पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

महिलांच्या ड्रेसिंंग स्टाईलवर बोलल्या जया बच्चन, पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. सध्या त्यांच्या नातीचा म्हणजेच नव्या नवेली नंदाचा What the hell Navya 'व्हॉट द हेल नव्या' हा पॉडकास्ट गाजतोय. यामध्ये नव्या सोबत तिची आई श्वेता बच्चन नंदा आणि आज्जी जया बच्चन विविध विषयांवर चर्चा करतात. नुकत्याच आलेल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये जया बच्चन यांनी श्वेता आणि नव्या दोघींना प्रश्न विचारला ज्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

व्हॉट द हेल नव्या चा दुसरा भाग One crwon, Many shoes 'वन क्राऊन, मेनी शुज' या भागात जया बच्चन विचारतात, 'आजकालच्या महिला केवळ पाश्चात्त्य कपडे घालत आहेत. असे का ? पुरुषांसारखे कपडे घालुनच त्यांच्यात आत्मविश्वास येतो का?'

यावर श्वेता नेदा यांनी उत्तर दिले आहे, की 'सध्या महिला या घरातली कामे आटोपुन बाहेर काम करतात. पाश्चात्त्य कपड्यांमध्येच काम करणे आता सोपे वाटते.'

 मात्र जया बच्चन यांना हे उत्तर समाधानकारक वाटले नाही. त्या म्हणतात, 'मला महिलेला नारीशक्तीच्या रुपात बघताना एक महिला म्हणुनच बघायला आवडेल.' यावर नव्या नवेलीनेही नायकासारख्या फॅशन ब्रॅंडच्या सीईओ यांना मी नेहमीच साडीतच बघितले आहे असे सांगत त्यांचे कौतुक केले.

'व्हॉट द हेल' नव्या या पॉडकास्ट मध्ये जया बच्चन, श्वेता नंदा आणि नव्या प्रामुख्याने महिलांच्या विषयावर चर्चा करतात. यापुर्वीच्या एपिसोडमध्येही जया बच्चन एका विधानाने चर्चेत आल्या होत्या. नव्या लग्नाआधी प्रेग्नंट झाली तरी माझी काही हरकत नाही असे बेधडक विधान त्यांनी केले होते. यावर त्या ट्रोलही झाल्या होत्या. आता महिलांच्या पाश्चिमात्य ड्रेसिंग स्टाईलवरुन केलेल्या विधानानंतरही त्या चर्चेत आल्या आहेत.
 

Web Title: jaya-bachchan-asked-nowadyas-women-feel-powerful-in-western-clothes-only-why-so