शिखर पहारियाची आई स्मृती शिंदेनं केलं जान्हवी कपूरचं कौतुक, खास पोस्ट केली शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 17:22 IST2025-05-22T17:22:28+5:302025-05-22T17:22:44+5:30
जान्हवीचं होणाऱ्या सासूनंही कौतुक केलं आहे.

शिखर पहारियाची आई स्मृती शिंदेनं केलं जान्हवी कपूरचं कौतुक, खास पोस्ट केली शेअर
सध्या अभिनेत्री जान्हवी कपूर हिची चर्चा सुरू आहे. यंदा ७८ व्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर जान्हवी कपूरनेही (Janhvi Kapoor) डेब्यू केला. यावेळी जान्हवीच्या सौंदर्याचा जलवा (Janhvi Kapoor In Cannes Film Festival) पाहायला मिळाला. जान्हवीने गुलाबी रंगाचा कॉर्सेट परिधान केला होत. ज्यात एकदम स्टायलिश दिसत होती. जान्हवी कपूरचा कान्समध्ये डेब्यू तिच्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण होता. तिला पाठिंबा देण्यासाठी बहीण खुशी कपूर, बॉयफ्रेंड शिखर पहारिया यांनी खास पोस्ट केल्यात. ऐवढेच नाही तर जान्हवीचं होणाऱ्या सासूनंही कौतुक केलं आहे.
जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाची आई स्मृती शिंदे यांनी अभिनेत्रीसाठी खास पोस्ट केली आहे. त्यांनी जान्हवीचा कान्समधील लूक इन्स्टा स्टोरीवर शेअर केला. त्यासोबत त्यांनी लिहलं, "जानू... तुझं अद्भुत पदार्पणाबद्दल खूप अभिनंदन... अजून बऱ्याच चांगल्या गोष्टी तुझ्या आयुष्यात येणार आहे. कायम अशीच चमकत राहा", या शब्दात त्यांनी लेकाच्या गर्लफ्रेंडचं कौतुक केलंय. स्मृती शिंदे यांच्या या पोस्टवरुन त्यांना जान्हवी ही सून म्हणून पसंत असल्याचं स्पष्ट झालंय. कान्सच्या निमित्तानं जान्हवी आणि स्मृती यांच्यात एक खास नात असल्याचं चाहत्यांना पाहायला मिळालं आहे. जान्हवी कपूर सध्या शिखर डेट करत आहे, जो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. शिखर हा स्मृती शिंदे यांचा मुलगा आहे.
जान्हवीच्या कान्समधील लूकबद्दल
जान्हवीनं डिझायनर तरुण ताहिलियानी यांनी डिझाइन केलेला एक अतिशय सुंदर गाऊन घातला होता. बनारस हस्तकला असलेल्या आऊटफिटवर जान्हवीनं मोत्याचा आकर्षक नेकलेस घातला होता. मिनिमल मेकअपमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या लूकमध्ये भारतीय रॉयल्टीची झलक दिसली.
'होमबाऊंड' सिनेमाचा प्रीमियर
जान्हवी कपूरचा कान्समधील डेब्यू संस्मरणीय ठरला. त्याचे कारण म्हणजे तिच्या 'होमबाऊंड' सिनेमाचा कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या अन सर्टेन रिगार्ड विभागात वर्ल्ड प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे 'होमबाउंड' सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी ९ मिनिटे उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली. धर्मा प्रॉडक्शन्सने सोशल मीडियावर या प्रीमियरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात संपूर्ण थिएटर टाळ्यांनी दुमदुमलेले दिसून येतंय.