बॉयफ्रेंड शिखर पहाडियाचा फोन तपासते जान्हवी कपूर ? खुलासा करत म्हणाली - 'हा रेड फ्लॅग आहे, पण...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 12:40 PM2024-05-24T12:40:37+5:302024-05-24T13:05:02+5:30

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जान्हवीने ती बॉयफ्रेंडचा फोन तपासते की नाही, याचा खुलासा केला आहे.

Janhvi Kapoor Reveals She Checks Her Boyfriend Shikhar Pahariya's Phone: 'It's a Red Flag But...' | बॉयफ्रेंड शिखर पहाडियाचा फोन तपासते जान्हवी कपूर ? खुलासा करत म्हणाली - 'हा रेड फ्लॅग आहे, पण...'

बॉयफ्रेंड शिखर पहाडियाचा फोन तपासते जान्हवी कपूर ? खुलासा करत म्हणाली - 'हा रेड फ्लॅग आहे, पण...'

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. जान्हवी कपूर गेल्या काही काळापासून शिखर पहाडियाला डेट करतेय. "कॉफी विथ करण 8"मध्ये जान्हवीने अप्रत्यक्षरित्या तिच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केला होता. लवकरच दोघे लग्न करणार असल्याचेही बोललं जात. जान्हवी ही बॉयफ्रेंड शिखर पहाडियावरील प्रेम व्यक्त करण्याची कुठलीच संधी सोडत नाही. अलिकडेत तिनं थेट शिखू’ असं नाव असलेला नेकलेस परिधान केला होता आणि भर कार्यक्रमात मिरवली होती. यातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जान्हवीने ती बॉयफ्रेंडचा फोन तपासते की नाही, याचा खुलासा केला आहे. 

अलिकडेच जान्हवीनं तिच्या 'मिस्टर अँड मिसेज माही' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका ठिकाणी मुलाखत दिली. यावेळी जान्हवीला जोडीदाराचा फोन चेक करण्याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला, त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सगळ्यांच लक्ष वेधलं. मुलाखतीमध्ये जान्हवीला विचारण्यात आलं की 'गर्लफ्रेंड्सना त्यांच्या बॉयफ्रेंडचे फोन तपासण्याची परवानगी असावी का?' यावर जान्हवी म्हणाली, 'मला माहित आहे की हा रेड फ्लॅग आहे, पण मी मात्र फोन तपासत असते'.

यावर जान्हवीला विचारलं की, 'बॉयफ्रेंडला त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन तपासण्याची परवानगी असायला हवी का?' यावर तिन 'नाही' असं उत्तर दिलं. मग 'बॉयफ्रेंड्सना फोन तपासण्याची परवानगी का असू नये', असेही तिला विचारण्यात आलं. यावर जान्हवी म्हणाली, 'का, तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?' जान्हवीचं हे उत्तर ऐकून प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. बऱ्याच वर्षांपासून जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत आहे. मधल्या काळात जान्हवीच्या बॉलिवूड पदार्पणाआधीच त्यांचं ब्रेकअप झालं होतं. मात्र शिखरकडून नातं संपलं नव्हतं. तो तरीही जान्हवीची वाट पाहत होता असं स्वत: जान्हवीने सांगितलं होतं. नंतर दोघं पुन्हा एकत्र आले. आता दोघंही सार्वजनिक ठिकाणीही हातात हात घालून येतात. दरम्यान, जान्हवी आणि राजकुमार राव यांचा 'मिस्टर अँड मिसेज माही' हा चित्रपट ३१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 

Web Title: Janhvi Kapoor Reveals She Checks Her Boyfriend Shikhar Pahariya's Phone: 'It's a Red Flag But...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.