लंडनमध्ये जान्हवी कपूर आणि न्यासा देवगनसोबत सुट्टी एन्जॉय करतोय ओरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 13:54 IST2023-12-18T13:51:01+5:302023-12-18T13:54:37+5:30
ओरीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लंडन ट्रिपचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

लंडनमध्ये जान्हवी कपूर आणि न्यासा देवगनसोबत सुट्टी एन्जॉय करतोय ओरी
ओरी उर्फ ओरहान अवतारमणि हे नाव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कधी जान्हवी कपूर, कधी सारा अली खान आणि अनन्या पांडे, कधी नीशा देवगण, नीता अंबानी किंवा इतर मोठ्या फिल्म स्टार्ससोबत दिसतो. आता ओरीचे नवे फोटो चर्चेत आले आहेत. ओरी लंडनमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर आणि न्यासा देवगनसोबत सुट्टी एन्जॉय करत आहेत.
ओरीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लंडन ट्रिपचे अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ओरी लंडनच्या रस्त्यावर जान्हवी कपूरसोबत फिरताना दिसत आहे. तसेच त्यांच्यासोबत न्यासा देवगनही दिसून आली. यासोबतच एक व्हिडीओही त्याने शेअर केला आहे. यामध्ये ते स्विंग करताना दिसत आहे. ओरीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ' द व्हॅकेशन ऑफ व्हॅल्यू'. ओरीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जान्हवी कपूर आणि न्यासा या ओरीच्या चांगल्या मैत्रीण आहेत. ओरी बिग बॉसमध्ये गेल्यावर जान्हवीने त्याच्यासाठी खास पोस्ट केली होती. अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगनही अनेकदा ओरीसोबत पार्टी करताना दिसत आहे. हा बॉलिवूडच्या अनेक स्टारकिड्सचा खास मित्र आहे. अनेक पार्ट्यांमध्ये तो त्यांच्यासह दिसत असतो.