जॅकलीन फर्नांडिसने कॅमेरासमोर दिल्या अशा काही पोज, काही मिनिटांमध्ये व्हायरल झाले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 16:46 IST2022-03-26T16:45:29+5:302022-03-26T16:46:50+5:30
Jacqueline Fernandez : जॅकलीनने कॅमेरासमोर आपल्या मोहक अदा दाखवल्या. या फोटोंमध्ये जॅकलीन हाय स्लिट गाउनमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

जॅकलीन फर्नांडिसने कॅमेरासमोर दिल्या अशा काही पोज, काही मिनिटांमध्ये व्हायरल झाले फोटो
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) चे फॅन्स तिच्या फोटोंची आतुरतेने वाट बघत असतात. कारण ती नेहमीच आपल्या फॅन्ससाठी तिचे खास फोटो शेअर करत असते. तिने फोटो शेअर केल्या केल्या ते व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा फॅन्ससाठी तिने काही ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.
जॅकलीनने कॅमेरासमोर आपल्या मोहक अदा दाखवल्या. या फोटोंमध्ये जॅकलीन हाय स्लिट गाउनमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. काउचवर बसून तिने एकापेक्षा एक खास पोज दिल्या आहेत. ज्या बघून फॅन्सच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर जॅकलीन फर्नांडिसचा बच्चन पांडे सिनेमा रिलीज झाला आहे. यात ती अक्षय कुमार, अरशद वारसी, क्रिती सेनन यांच्यासोबत दिसली. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. आता जॅकलीनचा अटॅक सिनेमा १ एप्रिलला रिलीज होणार आहे. ज्यात ती जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. तसेच यात रकुल प्रीत सिंह सुद्धा दिसरणार आहे.