Video: कबीर खान, मनीष मल्होत्रानंतर गौरी खान करतेय जॅकलिन फर्नांडिसचं घर डिझाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 11:08 AM2022-10-12T11:08:36+5:302022-10-12T11:09:21+5:30

कबीर खान, मनीष मल्होत्रानंतर आता गौरी खान जॅकलिनचं घर डिझाईन करतेय. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

Jacqueline Fernandez getting Gauri Khan to design the house see the video | Video: कबीर खान, मनीष मल्होत्रानंतर गौरी खान करतेय जॅकलिन फर्नांडिसचं घर डिझाईन

Video: कबीर खान, मनीष मल्होत्रानंतर गौरी खान करतेय जॅकलिन फर्नांडिसचं घर डिझाईन

googlenewsNext

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस(Jacqueline Fernandez)  200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग  प्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याप्रकरणी ईडीने जॅकलिनीची दीर्घकाळ चौकशी केली होती. त्यानंतर जॅकलिन पहिल्यांदाच दिसली. 

कबीर खान, मनीष मल्होत्रानंतर आता गौरी खान जॅकलिनचं घर डिझाईन करतेय. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये गौरी खान जॅकलिनचं घरं डिझाइन करताना दिसतेय. 

गौरी खान लवकरच जॅकलिनचं घर डिझाइन करताना दिसणार आहे. त्याचा प्रोमोही रिलीज झाला आहे. 30 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये दोघांमधील संवादाची झलक दिसतेय. यासोबतच जॅकलिनच्या रूमचे डिझाईनही शेअर केले आहे. शोचा पूर्ण भाग १४ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. 

२२ ऑक्टोबरला होणार पुढील सुनावणी
 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे जॅकलिन फर्नांडिस लाईमलाईटपासून दूर राहिली आहे. न्यायालयाने जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 ऑक्टोबरला होणार आहे.
 जॅकलिनने ईडीसमोर सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याची कबुली दिली होती.

गौरी खान एक इंटिरियर डिझायनर आहे. यापूर्वी तिने अनेक सेलिब्रिटींची घरं डिझाइन केली आहेत. गौरी खान ड्रीम होम नावाचा शो देखील चालवत आहे. नुकतीच या शोमध्ये दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खान देखील दिसली होती. आता या शोच्या पुढच्या भागात जॅकलीन दिसणार आहे.

Web Title: Jacqueline Fernandez getting Gauri Khan to design the house see the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.