जॅकीने लहान मुलाला उचललं, मागून येणाऱ्या पत्नीच्या तोंडावरच बसली लाथ; मग रकुलने जे केलं...; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 14:56 IST2025-10-20T14:52:58+5:302025-10-20T14:56:06+5:30
उत्साहात जॅकीने लहान मुलाला उचललं, पण त्याची लाथ पत्नी रकूल प्रीतला बसली, सासरे हसतच राहिले. व्हिडीओ बघाच

जॅकीने लहान मुलाला उचललं, मागून येणाऱ्या पत्नीच्या तोंडावरच बसली लाथ; मग रकुलने जे केलं...; व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) आणि रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) हे दिवाळीच्या एक दिवस आधी कुटुंबासोबत डिनरसाठी बाहेर पडले होते. यावेळी त्यांच्यासोबत एक अशी मजेदार घटना घडली, जी पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुटलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय घडलं नेमकं?
रकुलच्या चेहऱ्यावर बसली लाथ
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण भगनानी कुटुंब एका रेस्टॉरंटबाहेर दिसत आहे. यावेळी जॅकी भगनानी एका लहान मुलाला उत्साहात उचलून घेतो. त्याचवेळी त्याची पत्नी आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंग मागून त्यांच्या जवळ येते आणि नेमक्या त्याच क्षणी त्या मुलाचा पाय रकुलच्या चेहऱ्यावर जोरात लागतो. अचानक चेहऱ्यावर लहान मुलाची लाथ बसल्याने रकुल क्षणभर थक्क होते. तिचा चेहरा बघण्यासारखा असतो. विशेष म्हणजे, रकुलच्या अगदी मागे उभे असलेले तिचे सासरे ही संपूर्ण घटना पाहून हसू आवरू शकले नाहीत.
या घटनेनंतरही जॅकी भगनानीने त्या लहान मुलाला उचलून शाहरुख खान स्टाईलमध्ये पोज दिली. रकुल थोडावेळ बाजूला उभी राहून ही मजा बघत राहिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि लोक यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले, "बिचारी रकुल! तिला जास्त लागले नाही ना?", दुसऱ्या एका युजरने टिप्पणी केली, "जॅकीला काही फरक पडला नाही, तो आपल्या मस्तीमध्ये होता.", तर एका चाहत्याने सासऱ्यांच्या हसण्यावर लक्ष वेधून लिहिलं, "पाहा! सासरचे लोक कसे हसत आहेत." जॅकी आणि रकुल प्रीत सिंग यांचं लग्न २०२४ मध्ये झालं असून, ते नेहमीच त्यांचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात.