'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता बॉलिवूड अभिनेता, कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 12:28 IST2025-09-21T12:27:36+5:302025-09-21T12:28:06+5:30
मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात अभिनेता इंदर कुमार इतका वेडा होता की तो कधीही अभिनेत्रीच्या आठवणीतून बाहेर येऊ शकला नाही.

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता बॉलिवूड अभिनेता, कोण आहे ती?
दिवंगत अभिनेता इंदर कुमारची अभिनय कारकीर्द आणि वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेत राहिलं. इंदर कुमारनं आपल्या कारकिर्दीत सुमारे २० चित्रपटांमध्ये काम केले. सुपरस्टार सलमान खानसोबतची त्यांची मैत्री खूप गाजली होती. दोघांनी 'वॉन्टेड', 'तुमको ना भूल पायेंगे' आणि 'कहीं प्यार ना हो जाये' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तुम्हाला माहितेय इंद्र कुमार एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा होता.
ज्या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात इंदर कुमार आकंठ बुडाला होता, ती अभिनेत्री म्हणजे ईशा कोप्पीकर. ईशाच्या प्रेमात इंदर कुमार कधीही त्याच्या पत्नीवर प्रेम करू शकला नाही. ईशा कोप्पीकर आणि इंदर कुमार यांनी एकमेंकाना १२ वर्षे डेट केले, पण अखेर त्यांचे ब्रेकअप झाले. इंदरची पहिली पत्नी सोनल करिया हिने एका मुलाखतीत खुलासा केला होता, की ईशापासून वेगळं झाल्यानंतरही इंदर तिच्या प्रेमात होता आणि तो तिला कधीच विसरू शकला नाही. सोनलने त्यांच्या घटस्फोटामागे ईशा हे एक महत्त्वाचे कारण असल्याचं म्हटलं होतं.
इंदरनं सोनलशी घटस्फोट घेतल्यानंतर २००९ मध्ये कमलजीत कौरशी लग्न केले, पण हे लग्नही त्याच वर्षी तुटले. त्यानंतर, २०१३ मध्ये त्याने पल्लवी सराफशी तिसरे लग्न केले, पण २०१७ मध्ये ते दोघेही वेगळे झाले. शेवटच्या क्षणांपर्यंत इंदरला आयुष्यात शांतता मिळाली नाही, असे म्हटले जाते. २८ जुलै २०१७ रोजी पहाटे २ वाजता अंधेरी येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. त्याच्या मृत्यूने त्याच्या दुर्दैवी आयुष्याचा अंत झाला.