दिवाळीनिमित्त इरफानच्या पत्नीला मिळालं अनोखं गिफ्ट, अमिताभ बच्चन यांनी केली 'ही' खास गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 10:39 IST2025-10-21T10:36:00+5:302025-10-21T10:39:43+5:30
इरफानची पत्नी सुतपा हिला अमिताभ बच्चन यांच्याकडून दिवाळीनिमित्त खास गिफ्ट मिळालं आहे. त्यामुळे चाहते भावुक झाले आहेत

दिवाळीनिमित्त इरफानच्या पत्नीला मिळालं अनोखं गिफ्ट, अमिताभ बच्चन यांनी केली 'ही' खास गोष्ट
दिवंगत अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) आजही त्याच्या अभिनयामुळे चाहत्यांच्या स्मरणात आहे. इरफानचं काही वर्षांपूर्वी निधन झालं तरीही त्याचे सिनेमे आणि अभिनय अनेकांना प्रेरणा देतात. अशातच दिवाळीच्या खास मुहूर्तावर इरफानची पत्नी सुतपा सिकदरला (Sutapa Sikdar) एक अनोखी आणि खास भेटवस्तू मिळाली आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून हे खास गिफ्ट मिळालं आहे.
सर्वात अर्थपूर्ण दिवाळी गिफ्ट
२० ऑक्टोबर २०२५ रोजी दिवाळीच्या दिवशी सुतपा सिकदर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये त्यांनी इरफान खान यांच्यावर लिहिलेल्या एका पुस्तकाचे कव्हर दाखवलं आणि लिहिलं, "हे दिवाळीचे सर्वात अर्थपूर्ण गिफ्ट आहे." सुतपा यांनी शेअर केलेलं हे पुस्तक अनुप सिंग यांनी लिहिलं आहे. या पुस्तकाचं नाव 'इरफान- डायलॉग विथ द विंड' असं आहे.
सर्वात खास गोष्ट म्हणजे, या पुस्तकाची प्रस्तावना स्वतः अमिताभ बच्चन यांनी लिहिली आहे. या पुस्तकात चित्रपट निर्माता अनुप सिंग यांनी इरफान खान यांच्यासोबतची त्यांची मैत्री आणि व्यावसायिक संबंधांबद्दल लिहिले आहे. तसंच, इरफान खान यांचा अभिनय प्रवास आणि त्यांच्या जीवनातील अनेक पैलू या पुस्तकातून वाचकांसमोर येणार आहेत. सुतपा यांनी हे पुस्तक सोशल मीडियावर शेअर करून इरफान खान यांच्या चाहत्यांना ही खास बातमी दिली आहे. त्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय स्वतः बिग बींनी या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली असल्याने अनेकांना हे पुस्तक वाचण्याची उत्सुकता आहे.