‘सलमान खानवर असलेल्या आरोपांचा तपास करा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 06:12 IST2019-09-07T06:12:52+5:302019-09-07T06:12:58+5:30

सलमान खान सायकलवर बसला असताना त्याचे फोटो काढण्यास गेलेल्या पत्रकाराला त्याने व त्याच्या सुरक्षारक्षकाने मारहाण केली

'Investigate allegations against Salman Khan' | ‘सलमान खानवर असलेल्या आरोपांचा तपास करा’

‘सलमान खानवर असलेल्या आरोपांचा तपास करा’

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्याविरुद्ध आणखी एक केस दाखल झाली आहे. एका पत्रकाराने सलमान खानने आपल्याला मारहाण केली, असा आरोप केला आहे. या आरोपाबाबत तपास करण्याचा आदेश अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांना दिला आहे.

सलमान खान सायकलवर बसला असताना त्याचे फोटो काढण्यास गेलेल्या पत्रकाराला त्याने व त्याच्या सुरक्षारक्षकाने मारहाण केली. या पत्रकाराने सलमानकडून फोटो काढण्याची परवानगी घेतली होती, असे तक्रारीत नमूद आहे. अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांना शुक्रवारी तपासांअंती अहवाल देण्याचा आदेश दिला.

 

Web Title: 'Investigate allegations against Salman Khan'