या इंटरनॅशनल सेलिब्रेटीने सलमान, शाहरूख खानकडे मागितले काम; बॉलिवूडमध्ये हवा ब्रेक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 17:00 IST2017-12-16T11:30:28+5:302017-12-16T17:00:28+5:30

बॉलिवूडच्या जवळपास सगळ्याच कलाकारांमध्ये हॉलिवूड किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काम करण्याची जिज्ञासा असते. परंतु गेल्या काही काळाचा विचार केल्यास आंतरराष्ट्रीय ...

This international celebrity has asked for Salman, Shah Rukh Khan; Air break in Bollywood! | या इंटरनॅशनल सेलिब्रेटीने सलमान, शाहरूख खानकडे मागितले काम; बॉलिवूडमध्ये हवा ब्रेक!

या इंटरनॅशनल सेलिब्रेटीने सलमान, शाहरूख खानकडे मागितले काम; बॉलिवूडमध्ये हवा ब्रेक!

लिवूडच्या जवळपास सगळ्याच कलाकारांमध्ये हॉलिवूड किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काम करण्याची जिज्ञासा असते. परंतु गेल्या काही काळाचा विचार केल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकार बॉलिवूडमध्ये काम करण्यास आतुर असल्याचे दिसून येत आहे. आता हेच बघा ना, आंतरराष्ट्रीय सेनसेशन बनलेल्या अमांडा र्केनीने बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शकांकडे काम मिळवून देण्यासाठी मदत मागितली आहे. अमांडाने शाहरूख खान, सलमान खान, करण जोहर आणि रोहित शेट्टी या दिग्गजांकडे कामासाठी अपील केली आहे. अमांडाने एका पोस्टच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त करताना या दिग्गजांकडे मदत मागितली आहे. 

अमांडा सोशल मीडिया स्टार असून, तिचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतो. काहीकाळांपूर्वीच अमांडाने सोशल मीडियावर तिचे स्वीमिंग करतानाचा एक बोल्ड व्हिडीओ पोस्ट करून खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, २६ वर्षीय अमांडाने ही पोस्ट शेअर करताच तिच्या चाहत्यांनी ट्विट आणि मॅसेज करण्यास सुरुवात केली आहे. चाहत्यांचा उत्साह पाहता अमांडाची ही पोस्ट भारतात सर्वत्र पसरली जावी असाच त्यांचा हेतू असल्याचे दिसून येत आहे. परंतु अद्यापपर्यंत अमांडाच्या या मॅसेजला एकाही बॉलिवूड सेलिब्रिटीने रिप्लाय दिला नसल्याने अमांडाच्या मदतीला कोणता सेलिब्रिटी धावून येतो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 



अमांडाला सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटोग्राफ्स आणि सेक्सी व्हिडीओ अपलोड करण्यासाठी ओळखले जाते. इन्स्टाग्रामवर ती प्रचंड लोकप्रिय असून, तिच्या चाहत्यांची संख्या करोडोंमध्ये आहे. अमांडा र्केनी एक अभिनेत्री होण्याबरोबरच सीईओ आणि दिग्दर्शकही आहे. यू-ट्यूबवर तिचे ‘मिस अमांडा र्केनी’ या नावाचा पेज असून, त्यास कोट्यवधी लोक डेसी फॉलो करतात. तिला या पेजवर फनी व्हिडीओ बनविण्यासाठी ओळखले जाते. 



दरम्यान, अमांडाला बॉलिवूडमध्ये कोण संधी देणार? हा प्रश्न उपस्थित केला असता सगळ्यांच्या तोंडी सलमान खान हे नाव येत आहे. कारण सलमानला नव्या चेहºयांना बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी ओळखले जाते. त्याचबरोबर तो बºयाचशा देशी-विदेशी कलाकारांचा गॉडफादरही आहे. अशात सलमान अमांडाच्या मदतीला धावून जाऊ शकतो. तसेच निर्माता करण जोहर हा स्टार किड्सचा दाता असल्याने त्याच्याकडूनही अमांडाला अपेक्षा आहे. 

Web Title: This international celebrity has asked for Salman, Shah Rukh Khan; Air break in Bollywood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.