अशी रंगली ‘सिम्बा’ची सक्सेस पार्टी! पाहा, इनसाईड व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 10:11 IST2019-01-08T10:09:03+5:302019-01-08T10:11:40+5:30

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि रणवीर सिंग व सारा अली खान स्टारर ‘सिम्बा’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. मग, सेलिब्रेशन तो बनता है ना यार... काल ‘सिम्बा’ची धम्माल सक्सेस पार्टी रंगली. ‘सिम्बा’च्या अख्ख्या टीमने या पार्टीत रंग भरले.

Inside Simmba success bash: Deepika Padukone blesses husband Ranveer Singh as Ajay Devgn, Akshay Kuma | अशी रंगली ‘सिम्बा’ची सक्सेस पार्टी! पाहा, इनसाईड व्हिडिओ!!

अशी रंगली ‘सिम्बा’ची सक्सेस पार्टी! पाहा, इनसाईड व्हिडिओ!!

ठळक मुद्देसोमवारी रात्री उशीरापर्यंत ही पार्टी चालली. ‘सिम्बा’च्या टीमने मीडियासमोर येत फोटो काढले. यावेळी रणवीरचा अंदाज पाहण्यासारखा होता. त्याने पार्टीत झकास एन्ट्री केली आणि सगळे बघतचं राहिले.

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि रणवीर सिंगसारा अली खान स्टारर ‘सिम्बा’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. मग, सेलिब्रेशन तो बनता है ना यार... काल ‘सिम्बा’ची धम्माल सक्सेस पार्टी रंगली. ‘सिम्बा’च्या अख्ख्या टीमने या पार्टीत रंग भरले. रोहित शेट्टी, ‘सिम्बा’चा निर्माता करण जोहर, रणवीर सिंग, सारा अली खान ही सगळी टीम तर होतीच. शिवाय रणवीरची पत्नी दीपिका पादुकोण आणि रोहितचा जिगरी यार अजय देवगण व अक्षय कुमार यांनीही या पार्टीत हजेरी लावली. सोमवारी रात्री उशीरापर्यंत ही पार्टी चालली. ‘सिम्बा’च्या टीमने मीडियासमोर येत फोटो काढले. यावेळी रणवीरचा अंदाज पाहण्यासारखा होता. त्याने पार्टीत झकास एन्ट्री केली आणि सगळे बघतचं राहिले. मग नाच गाणे, दंगा मस्ती...असे सगळे झाले.

रणवीर व साराने ‘सिम्बा’चे हिट नंबर ‘आंख मारें’वर जबरदस्त ताल धरला. तेव्हा पाहुया, या पार्टीचे काही इनसाईड फोटो व व्हिडिओ....


रणवीर सिंग स्टारर ‘सिम्बा’ने ‘छप्परफाड’ कमाई केली आहे. ओपनिंग डेवर २०.७२ कोटीची कमाई करून समीक्षक व प्रेक्षक दोन्हींची मने जिंकणारा ‘सिम्बा’ने १०० कोटी क्लबमध्ये कधीच एन्ट्री मिळवली आणि बघता बघता २०० कोटींचा आकडाही पार केला. ‘सिम्बा’ने रणवीरच्याच ‘बाजीराव मस्तानी’चा रेकॉर्ड तोडला. होय, ‘सिम्बा’ नऊ दिवसांत ‘बाजीराव मस्तानी’हून अधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. रणवीरच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाने भारतात १८४ कोटींची कमाई केली होती. तर जगभरात ३५८ कोटींचा गल्ला जमवला होता.

Web Title: Inside Simmba success bash: Deepika Padukone blesses husband Ranveer Singh as Ajay Devgn, Akshay Kuma