तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ; देवदेवतांचा अपमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 17:24 IST2023-03-29T17:23:36+5:302023-03-29T17:24:37+5:30

Taapsee pannu: मध्य प्रदेशमधील इंदूर येथे तापसी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली

indore police register complaint against actress taapsee pannu for allegedly hurting religious sentiments | तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ; देवदेवतांचा अपमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल

तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ; देवदेवतांचा अपमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल

आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येणारी अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsee Pannu) सध्या वादात सापडली आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याप्रकरणी तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मध्य प्रदेशमधील इंदूर येथे तापसी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून एकलव्य गौर नामक व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे.

छत्रीपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तापसीने सनातन धर्माचा अपमान केल्याचं म्हणत एकलव्य गौर या व्यक्तीने तापसी विरोधात तक्रार दाखल केली आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने  अलिकडेच एका फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक केला होता. यावेळी तिने बोल्ड ड्रेस परिधान केला होता.विशेष म्हणजे या बोल्ड ड्रेसवर तिने लक्ष्मी देवीची प्रतिमा असलेलं लॉकेट परिधान केलं होतं. तिच्या या वागणुकीमुळे अनेकांनी तिच्यावर आक्षेप घेत विरोध केला. इतकंच नाही तर तिने हिंदू देवदेवतांचा अपमान केला  सनातन धर्माच्या भावना दुखावल्या आहेत असं म्हणत तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 

Web Title: indore police register complaint against actress taapsee pannu for allegedly hurting religious sentiments