पोलिस अधिकारी काजोलला क्रितीवर संशय! 'दो पत्ती'चा उत्कंठावर्धक टिझर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 19:22 IST2024-02-29T19:20:06+5:302024-02-29T19:22:18+5:30
क्रिती सेननची निर्मिती असलेला पहिला सिनेमा 'दो पत्ती'चा टिझर एकदा बघाच

पोलिस अधिकारी काजोलला क्रितीवर संशय! 'दो पत्ती'चा उत्कंठावर्धक टिझर रिलीज
सध्या क्रिती सेननचं करिअर उंचावर आहे. यावर्षी 'तेरी बातों में उलझा जिया' हा क्रितीचा शाहिद कपूरसोबतचा सिनेमा चांगलाच गाजला. शिवाय ती लवकरत तब्बू आणि करिना कपूरसोबत CREW सिनेमात झळकणार आहे. अशातच क्रितीच्या आणखी एका सिनेमाची घोषणा झालीय. या सिनेमात ती बॉलिवूड अभिनेत्री काजोलसोबत झळकणार आहे. या सिनेमाचंं नाव आहे 'दो पत्ती'. या सिनेमाचा टिझर काहीच वेळापुर्वी भेटीला आलाय.
29 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सने पोस्ट केलेल्या शशांक चतुर्वेदीच्या आगामी क्राईम थ्रिलर 'दो पत्ती' च्या टीझरमध्ये क्रिती सेनन एक मानसिक संतुलन बिघडलेली महिला दिसतेय. तर काजोल एका पोलिसाची भूमिका साकारत आहे. शहरात घडलेल्या संशयास्पद घटनांमागे क्रितीचा हात आहे, असा काजोलला संशय आहे. टिझरमध्ये क्रिती - काजोलमध्ये चोर - पोलिसाचा रंजक खेळ बघायला मिळतो.
'दो पत्ती' हा मिस्ट्री थ्रिलरची या वर्षातला बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या सिनेमाची विशेष गोष्ट म्हणजे क्रितीची निर्मिती संस्था ब्लू बटरफ्लायने सिनेमाची निर्मिती केलीय. क्रितीच्या प्रॉडक्शन हाऊसमधला हा पहिला सिनेमा असणार आहे. या सिनेमाची रिलीज डेट अद्याप समोर आली नसली तरीही पुढील काही महिन्यांमध्ये हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.