मलायका अरोरासारखी हवी असेल परफेक्ट फिगर आणि टोन्ड बॉडी, तर करा ही तीन आसनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 17:03 IST2021-04-06T17:03:07+5:302021-04-06T17:03:29+5:30
मलायका अरोरा बऱ्याचदा फिटनेसमुळे चर्चेत येत असते.

मलायका अरोरासारखी हवी असेल परफेक्ट फिगर आणि टोन्ड बॉडी, तर करा ही तीन आसनं
अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. कधी ग्लॅमरस फोटोमुळे तर कधी फिटनेसमुळे ती चर्चेत येते. तसेच ती सोशल मीडियावर देखील व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना फिट राहण्यासाठी टीप्स देत असते. नुकतेच मलायका अरोराने टोन्ड बॉडीसाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने तीन योगासनाबद्दल सांगितले आहे.
मलायका अरोराने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तीन योगासनाबद्दल सांगितले आहे. यात तिने दररोज वृक्षासन, उत्कटासन आणि नौकासन करून बॉडी टोन्ड करता येऊ शकते. सोबतच हे योगासन करून शरीर मजबूत बनते.
वृक्षासनचे फायदे सांगताना मलायका अरोराने पोस्टमध्ये लिहिले की, वृक्षासन मेंदू आणि शरीरात समतोल राखतो आणि तुमचे पाय आणि कंबर मजबूत बनवतो.
दुसरे आसन आहे नौकासन. नौकासनचे फायदे सांगताना अभिनेत्रीने लिहिले की, हे आसन पोटाच्या आजूबाजूची चरबी घटवण्यासाठी चांगले आहे. तुमची कंबर आणि मसल्समध्ये लवचिकता आणतो.
तिसरे आसन उत्कटासनबद्दल मलायका अरोराने लिहिले की, पाय, पाठ आणि कंबरमध्ये मजबूतपणा आणि लवचिकता आणते.हृदय आणि पोट या अंगाना मजबूत बनवते.
मलायका अरोरा बऱ्याचदा योग आणि वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. बऱ्याचदा ती कठीण आसनदेखील सहजतेने करताना दिसते.