​दीपिका असेल तर कॅट सोडणार ‘हा’ चित्रपट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 17:29 IST2016-11-02T17:29:04+5:302016-11-02T17:29:04+5:30

कॅटरिना कैफ आणि दीपिका पादुकोण यांच्यातील ‘कोल्डवॉर’ आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. इतके की, दोघीही एकमेकींचा चेहरा पाहणेही आवडत ...

If you are a Deepika, will you quit the film? | ​दीपिका असेल तर कॅट सोडणार ‘हा’ चित्रपट?

​दीपिका असेल तर कॅट सोडणार ‘हा’ चित्रपट?

टरिना कैफ आणि दीपिका पादुकोण यांच्यातील ‘कोल्डवॉर’ आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. इतके की, दोघीही एकमेकींचा चेहरा पाहणेही आवडत नाही. आता तर कॅट दीपिकामुळे एका बिग बजेट चित्रपटावर पाणी सोडण्याच्या तयारीत आहे. होय, शाहरूख खान आणि आनंद एल राय एका नव्या चित्रपटावर काम करीत आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण पुढील वर्षी डिसेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या कथेबद्दल अद्याप काही कळलेले नाही. मात्र यातील ‘लीडिंग लेडी’बद्द्ल मात्र नाही नाही त्या चर्चा ऐकायला येत आहेत. यात ‘लीडिंग लेडी’ असल्याचे कळतेय. कॅटरिना आणि दीपिका यांना या भूमिकांचा प्रस्ताव मिळाला आहे. पण सूत्रांचे मानाल तर, दीपिकासोबत काम करण्यास कॅटने स्पष्ट नकार दिलाय. दीपिका असेल तर मी नसेल, असे कॅटने निर्माता व दिग्दर्शकाला स्पष्टपणे बजावलेयं म्हणे. दीपिकासोबत स्क्रीन शेअर करायला कॅट अजिबात तयार नाही. आता असे का?  ते तुम्हीही समजू शकताच. 
कॅट व दीपिका परस्परांच्या प्रतिस्पर्धी आहेत. शिवाय दोघांचाही ‘एक्स’ही एकच आहे. कदाचित याचमुळे दोघी परस्परांचे तोंड पाहणेही पसंत करत नाहीत.  दोघीही यास्मिन कराचीवालाच्या जिममध्ये वर्कआऊट करतात. पण यादरम्यान दोघींचीही वेळ एक असू नये, याची दोघीही तितकीच काळजी घेतात. आता प्रकरण इतक्या थराला पोहोचले म्हटल्यावर एकमेकींसोबत काम करण्याची तर कल्पनाही करवत नाही. कदाचित याचमुळे आनंद एल राय यांना नकार देण्याइतपत कॅटने मनाची तयारी केली आहे. दीपिकाची याबाबतीत काय भूमिका आहे, ते अद्याप कळले नाही. पण तिथेही यापेक्षा काय वेगळे असणार आहे?

  

Web Title: If you are a Deepika, will you quit the film?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.