"सेक्स वाईट गोष्ट असेल तर...", 'बाहुबली'च्या 'त्या' सीनवर झालेली टीका, तमन्ना भाटियानं सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 15:46 IST2025-08-04T15:45:35+5:302025-08-04T15:46:10+5:30

Tamannaah Bhatia : २०१५ मध्ये तमन्ना भाटियाचा 'बाहुबली: द बिगिनिंग' हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यात प्रभास मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील एका सीनवरून वाद निर्माण झाला होता, ज्यामध्ये प्रभास तमन्नाचे कपडे काढून तिचा नॅचरल मेकअप करतो.

''If sex is a bad thing...'', Tamannaah Bhatia breaks silence on criticism of 'that' scene in 'Baahubali' | "सेक्स वाईट गोष्ट असेल तर...", 'बाहुबली'च्या 'त्या' सीनवर झालेली टीका, तमन्ना भाटियानं सोडलं मौन

"सेक्स वाईट गोष्ट असेल तर...", 'बाहुबली'च्या 'त्या' सीनवर झालेली टीका, तमन्ना भाटियानं सोडलं मौन

२०१५ मध्ये तमन्ना भाटिया(Tamannaah Bhatia)चा 'बाहुबली: द बिगिनिंग' हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यात प्रभास मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील एका सीनवरून वाद निर्माण झाला होता, ज्यामध्ये प्रभास तमन्नाचे कपडे काढून तिचा नॅचरल मेकअप करतो. या सीनवर 'अवंतिकाचा बलात्कार' नावाचा एक लेखही प्रकाशित झाला होता. अलीकडेच तमन्ना भाटियाने या प्रकरणावर मौन सोडले. 

द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत तमन्ना भाटियाने 'बाहुबली'च्या वादग्रस्त सीनबद्दल सांगितले की, ''जेव्हा लोक तुम्हाला नियंत्रित करू शकत नाहीत, तेव्हा ते एक तंत्र वापरतात आणि ते म्हणजे लाज आणि अपराधीपणा. कारण ते नेहमीच तुम्हाला असे वाटू देतात की तुम्ही जे काही करत आहात त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, जेव्हा ते तुम्हाला असे वाटायला भाग पाडतात, तेव्हा ते तुमच्यावर नियंत्रण मिळवू शकतात.''

''ते दिग्दर्शकाचे व्हिजन आहे''
तमन्ना भाटिया म्हणाली, ''जी गोष्ट इतकी पवित्र असते की आपण तिला सर्वात घाणेरड्या नजरेने पाहतो. त्या वृत्तीमुळे आपल्याला असे वाटते की आपल्या जीवनातील त्या पैलूची आपल्याला लाज वाटली पाहिजे, आपण ती लपवली पाहिजे, आपण त्याबद्दल बोलू नये किंवा आपण त्याबद्दल उघडपणे बोलू नये. आपण काहीतरी चुकीचे केले आहे, अशी जाणीव लोक करून देत असतात. पण ही जीवनातील सर्वात मूलभूत गोष्ट आहे. आज आपण येथे आहोत याचे हेच कारण आहे. चित्रपट पाहिल्यावर लोक त्याचे मूल्यांकन का करतात हे मला आजपर्यंत समजले नाही, ते दिग्दर्शकाचे व्हिजन आहे.''

त्या सीनबाबत राजामौलींचा हा होता दृष्टीकोण
तमन्नाने राजामौली यांचे त्या दृश्याबद्दलचा दृष्टीकोण सांगितला. ती म्हणाली, ''मला आठवते जेव्हा राजामौली सर मला संपूर्ण दृश्य समजावून सांगत होते, तेव्हा ते म्हणाले होते की, ती एक दैवी स्त्री आहे, जी आतून दुखावली आहे. ती सुंदर आहे. ती स्त्रीत्वाने परिपूर्ण आहे.' तिला प्रेम करायचे आहे, पण तिने आयुष्यात इतके दुःख सहन केले आहे की तिला वाटते की तिने सर्वांना स्वतःपासून दूर ठेवावे. ती कोणालाही तिच्या जवळ येऊ देत नाही कारण तिला भीती वाटते की लोक तिचा गैरफायदा घेतील. म्हणून ती मर्यादा पाळते. पण इथे एक मुलगा आहे, जो फक्त तिला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून स्वतःला ती किती सुंदर आहे हे पाहू शकेल.''

त्या सीनचे महत्त्व काय होते?
ती म्हणाली की, ''जर तुम्हाला ते व्हिजवली दाखवायचे असेल तर एक संपूर्ण दृश्य होते. कानातले घातले जातात, बिंदी लावली जाते. मग जेव्हा ती स्वतःकडे पाहते, स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहते तेव्हा तिला दिसते की अरे, मला नेहमीच वाटायचे की मला योद्धा म्हणून जगावे लागेल. तिने स्वतःला इतके मजबूत बनवले होते की तिची नम्रता, तिची निरागसता कुठेतरी हरवली होती आणि इथेच शिवाचे पात्र तिला पुन्हा तिच्या वास्तविक रूपाशी जोडते.''

लोक सेक्सला वाईट गोष्ट मानतात
तमन्ना भाटिया म्हणाली, ''हा दृष्टिकोन होता. आता हा त्यांचा दृष्टिकोन आहे. ते सर्व काही त्याच प्रकारे पाहतात. कारण प्रत्येकजण गोष्टींना आपापल्या पद्धतीने समजतो. तुम्ही काहीही दाखवू शकता, अगदी जगातील सर्वात पवित्र गोष्ट देखील. जर एखाद्याला वाटत असेल की सेक्स ही वाईट गोष्ट आहे किंवा शरीर ही वाईट गोष्ट आहे, तर तो तेच पाहेल. कारण तो त्याचा दृष्टिकोन आहे, त्याची विचारसरणी आहे. एक चित्रपट निर्माता तुम्हाला खूप सुंदर दाखवू इच्छितो, पण जर तुम्ही दुसरे काही पाहिले तर ती तुमची विचारसरणी आहे.''

Web Title: ''If sex is a bad thing...'', Tamannaah Bhatia breaks silence on criticism of 'that' scene in 'Baahubali'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.