"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 12:28 IST2025-05-16T12:28:24+5:302025-05-16T12:28:47+5:30

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने इंडस्ट्रीतील दिखाऊपणाच्या संस्कृतीवर प्रकाश टाकला आहे. याशिवाय या अभिनेत्रीने एक किस्सा सांगत बॉलिवूडची पोलखोल केली आहे

I was not allowed to attend the awards ceremony because my car was small kalki koechlin exposes Bollywood | "छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल

"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिन (kalki koechlin) ही अनेकदा इंडस्ट्रीबद्दल तिचं रोखठोक मत शेअर करत असते. अलीकडेच एका मुलाखतीत कल्कीने बॉलिवूडमधील जो दिखाऊपणा केला जातो त्याविषयी तिचा अनुभव शेअर केला आहे. इतकंच नव्हे तर छोटी गाडी घेऊन इव्हेंटला गेल्यावर कल्कीला प्रवेश कसा नाकारला जायचा, याचाही किस्सा सांगत कल्कीने बॉलिवूडची पोलखोल केली आहे.

कल्कीने सांगितला अनुभव 

कल्कीने एका मुलाखतीत सांगितलं की, "अनेक वर्ष मी माझ्या स्विफ्ट कारने फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये पोहोचत असे. माझा ड्रेस माझ्या कारपेक्षा मोठा असे. ते माझ्या कारला इव्हेंटच्या आत जाऊ देत नसत. याशिवाय मला माझं आमंत्रण दाखवून त्यांना सांगावं लागायचं की, 'ही मी आहे.'"  याशिवाय कल्कीने नाव न घेता काही कलाकारांची उदाहरणे दिली, जे मोठ्या गाड्यांमध्ये येतात पण प्रत्यक्षात लहान घरांमध्ये राहतात. कल्कीने सांगितले की, "मी अशा लोकांना ओळखते जे १ BHK फ्लॅटमध्ये राहतात, पण ऑडीमध्ये ड्रायव्हरसह मीटिंगला येतात." 


कल्की कोचलिने स्पष्ट केले की, अशा अनुभवांनंतरही तिने स्वतःच्या अटींवर जीवन जगणे कधीही सोडले नाही. तिने सांगितले की, "माझ्यासाठी, स्वातंत्र्य खूप महत्त्वाचे आहे. मी गोवा आणि मुंबईतील घरांमध्ये ये-जा करण्यासाठी पैसे खर्च करते, माझे सर्व पैसे तिथेच खर्च होतात." अशाप्रकारे कल्कीने बॉलिवूडमध्ये जो खोटा दिखाऊपणा दाखवला जातो त्यावर प्रकाश टाकला आहे. जिथे कलाकार स्वतःच्या इमेजसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करतात, परंतु प्रत्यक्षात त्यांचं जीवन वेगळे असते.

Web Title: I was not allowed to attend the awards ceremony because my car was small kalki koechlin exposes Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.