पती राहुलचा समुद्रात बुडून मृत्यू; आता पत्नीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली- "माझी विनंती आहे की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 13:13 IST2026-03-30T13:10:30+5:302026-03-30T13:13:45+5:30

बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री प्रियंका सरकार हिने सोशल मीडियावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे

Husband Rahul banerjee dies after drowning in the sea; Now his wife's first reaction | पती राहुलचा समुद्रात बुडून मृत्यू; आता पत्नीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली- "माझी विनंती आहे की..."

पती राहुलचा समुद्रात बुडून मृत्यू; आता पत्नीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली- "माझी विनंती आहे की..."

बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जीच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री प्रियंका सरकार हिने सोशल मीडियावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, कुटुंबासाठी हा काळ अत्यंत कठीण असल्याचे म्हटले आहे. प्रियंकाची ही पोस्ट वाचून सर्वांच्या डोळ्यांत पाणी आलंय.

प्रियंकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन लिहिलंय की, "हा काळ आमच्यासाठी अत्यंत दु:खद आणि निराशेचा आहे. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वांना विनंती करतो की, आम्हाला आमचा खासगी वेळ द्यावा. एका मुलाचे वडील, एका आईचा मुलगा आणि एका कुटुंबाचा आधार आम्ही गमावला आहे. आम्ही सर्वजण या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत."

प्रियंकाने आपल्या पोस्टमध्ये पुढे माध्यमांनाही विनंती केली आहे. ती म्हणाली, "मी आमचे मित्र आणि माध्यमातील सहकाऱ्यांना विनंती करते की, आमच्या कुटुंबातील वैयक्तिक वेळेचा आदर करावा. आमच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करू नका. हे दुःख शांततेत व्यक्त करण्याची आम्हाला थोडी मोकळीक द्या. या कठीण काळात तुम्ही आम्हाला ज्या प्रकारे समजून घ्याल आणि पाठिंबा द्याल, तो आमच्यासाठी मोलाचा आहे."


कसे झाले अभिनेता राहुलचे निधन?

राहुल अरुणोदय बॅनर्जी ओडिशामधील दिघा जवळ 'भोलेबाबा पार करेगा' या आगामी मालिकेचे चित्रीकरण करत होते. रविवारी दुपारी चित्रीकरण संपल्यानंतर राहुल एकटाच समुद्रकिनारी गेला होता, तिथे पाण्यात उतरल्यानंतर त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने राहुलच्या चाहत्यांमध्ये आणि चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. प्रियंका आणि राहुल यांनी २००८ मध्ये 'चिरोदिनी तुम्ही जे आमार' या सुपरहिट चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती.

२०१० मध्ये राहुल आणि प्रियंकाने लग्न केले, मात्र २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. तरीही, २०२३ मध्ये त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. हे दोघेही मिळून आपल्या मुलाचा सांभाळ मिळून करत होते. राहुलच्या अकस्मात निधनाने त्याची पत्नी प्रियंका आणि त्यांचा मुलगा सहज यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी प्रियांकाच्या या पोस्टवर शोक व्यक्त करत कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title : अभिनेता राहुल का निधन: पत्नी प्रियंका की पहली प्रतिक्रिया, 'मेरी विनती है कि...'

Web Summary : बंगाली अभिनेता राहुल बनर्जी के आकस्मिक निधन से फिल्म उद्योग सदमे में है। उनकी पत्नी, प्रियंका सरकार ने इस मुश्किल समय में गोपनीयता बनाए रखने का अनुरोध किया है, परिवार के अपार नुकसान और शांति से शोक मनाने के लिए जगह की आवश्यकता पर जोर दिया है। उन्होंने मीडिया से उनकी निजता का सम्मान करने का भी अनुरोध किया।

Web Title : Actor Rahul's death: Wife Priyanka's first reaction, 'I request that...'

Web Summary : Bengali actor Rahul Banerjee's sudden death has shocked the film industry. His wife, Priyanka Sarkar, has requested privacy during this difficult time, emphasizing the family's immense loss and need for space to grieve peacefully. She also requested media to respect their personal space.