बॉलिवूडचा किंग खान बनला सर्वांत श्रीमंत अभिनेता, एकाच वर्षात तब्बल 1 हजार कोटींनी घेतली झेप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 18:27 IST2024-08-29T18:23:24+5:302024-08-29T18:27:09+5:30

बॉलिवूडचा बादशाह किंग खानने हृतिक रोशन आणि अमिताभ बच्चन यांसारख्या अभिनेत्यांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला.

Hurun India Rich List 2024: Bollywood King Shah Rukh Khan is India's richest actor Net Worth details | बॉलिवूडचा किंग खान बनला सर्वांत श्रीमंत अभिनेता, एकाच वर्षात तब्बल 1 हजार कोटींनी घेतली झेप!

बॉलिवूडचा किंग खान बनला सर्वांत श्रीमंत अभिनेता, एकाच वर्षात तब्बल 1 हजार कोटींनी घेतली झेप!

Hurun India Rich List 2024 : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानने प्रचंड मेहनत आणि कष्टाच्या जोरावर आज बॉलिवूमध्ये स्वतःचं नाव कमावलंय. शाहरुखच्या सिनेमांची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. शाहरुखचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करतात. इतकंच नव्हे विविध भूमिकांनी शाहरुखही लोकांचं प्रेम मिळवतो. फक्त प्रसिद्धी आणि चाहत्यांचं प्रेमच नाही तर किंग खानने बक्कळ पैसादेखील कमावला आहे.  भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्याच्या नावाचा पहिल्यांदाच समावेश झाला आहे. 

बॉलिवूडचा बादशाह किंग खानने हृतिक रोशन आणि अमिताभ बच्चन यांसारख्या अभिनेत्यांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला. नुकतंच 'हुरून इंडिया रिच लिस्ट २०२४' रिलीज झाली. यानुसार, शाहरुख खान भारतातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. 

किंग खानची नेटवर्थ ७३०० कोटी एवढी झाली आहे. मागील वर्षी 'फोर्ब्स २०२३'ची यादी जाहीर झाली होती. ज्यात त्याची नेटवर्थ ६३०० कोटी एवढी होती. यानुसार, शाहरुखच्या नेटवर्थने एका वर्षात तब्बल एक हजार कोटींनी झेप घेतली आहे. या यादीत शाहरुख खानशिवाय अमिताभ बच्चन, जुही चावला, करण जोहर आणि हृतिक रोशन यांची नावेही आहेत. 


अमिताभ बच्चन यांची नेटवर्थ १६०० कोटी, जुही चावला हिची नेटवर्थ ४६०० कोटी, हृतिक रोशनची २००० कोटी आणि करण जोहरची १४०० कोटी एवढी नेटवर्थ झाली आहे. शाहरुख खानने याबाबतीत सर्वांना मागे सोडले आहे.  वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या त्याच्या 'किंग' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे शूटिंग बुडापेस्ट, हंगेरियात हाेणार आहे. 

Web Title: Hurun India Rich List 2024: Bollywood King Shah Rukh Khan is India's richest actor Net Worth details