'हंटर'चा सीक्वल बनणार पण... - गुलशन देवैया

By तेजल गावडे | Published: November 8, 2018 03:25 PM2018-11-08T15:25:44+5:302018-11-08T15:26:36+5:30

'हंटर' चित्रपटात गुलशन देवैयाने मंदार पोंक्षेची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली.

'Hunter' will be sequel but ... - Gulshan Devayya | 'हंटर'चा सीक्वल बनणार पण... - गुलशन देवैया

'हंटर'चा सीक्वल बनणार पण... - गुलशन देवैया

googlenewsNext
ठळक मुद्दे'हंटर' चित्रपटात गुलशन देवैयाने साकारली होती मंदार पोंक्षेची भूमिका

अभिनेता गुलशन देवैयाने हिंदी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर छाप पाडली आहे. २०१५ साली त्याची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'हंटर'मधून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. या चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. 'हंटर'चा सीक्वल बनणार आहे. मात्र त्याची घोषणा कधी होईल किंवा कधीपर्यंत प्रदर्शित होईल हे सांगता येत नाही, असे गुलशनने सांगितले व पुढे म्हणाला की, 'या चित्रपटाचा दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी हंटरच्या सीक्वल बनवण्याचा विचार करीत आहेत.' 

'हंटर' चित्रपटात गुलशन देवैयाने मंदार पोंक्षेची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा सिनेमा गुलशनच्या करियरमधील टर्निंग पॉइंट ठरला असल्याचे गुलशनने सांगितले. या चित्रपटानंतर प्रेक्षक या सिनेमाच्या सीक्वलची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 

या सीक्वलबाबत गुलशन देवैया म्हणाला की, ''हंटर'च्या सीक्वलबाबत माझे नुकतेच हर्षवर्धन यांच्यासोबत बोलणे झाले. ते म्हणाले की माझ्याकडे हंटरच्या सीक्वलसाठी कल्पना आहे. त्याच्यावर मी सध्या काम करतो आहे. पण घाई करणार नाही. त्यांनी दोन वर्षापूर्वी देखील हीच गोष्ट मला सांगितली होती की मी या चित्रपटाचा सीक्वल बनवला तर तो उगाच बनवायचा म्हणून बनवणार नाही. निर्माते व इतर सगळ्या गोष्टी सीक्वलसाठी तयार आहेत. परंतु जर मी आधीच्या चित्रपटापेक्षा जर चांगला सिनेमा बनवू शकत नाही तर मी बनवणार नाही.  त्यांच्या या मतांचा आदर मी करतो व त्यांच्या या मताशी मी सहमतदेखील आहे.'

'हंटर'चा सीक्वल भविष्यात येणार आहे. मात्र त्याच्या घोषणेची वाट पाहावी लागणार हे नक्की!

Web Title: 'Hunter' will be sequel but ... - Gulshan Devayya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.