कोंबडीशी मस्ती करत होती हुमा कुरेशी, अचानक कोंबडीने केलं असं काही की अभिनेत्री धूम ठोकून पळाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:23 IST2025-08-05T11:22:49+5:302025-08-05T11:23:28+5:30
कोंबडीशी मस्ती करतानाचा हुमाचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत असं काय घडलं की, हुमाचा फोनही फुटला. जाणून घ्या

कोंबडीशी मस्ती करत होती हुमा कुरेशी, अचानक कोंबडीने केलं असं काही की अभिनेत्री धूम ठोकून पळाली
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी ही सर्वांची लोकप्रिय अभिनेत्री. हुमाने विविध सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. हुमा अलीकडे भूतानमध्ये गेली होती. तिथे ती एका साहित्य आणि कला महोत्सवात सहभागी झाली होती. आपल्या प्रवासातील अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर करताना एक मजेशीर घटना सांगितली. हुमाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय या व्हिडीओत एका कोंबडीने तिच्यावर अचानक हल्ला केल्याने हुमाला पळावं लागलं
हुमा कुरेशीचा मजेशीर व्हिडीओ
हुमा कुरेशीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये ती भूतानमधील पुनाखा डझाँग परिसरात फिरताना दिसते. याच व्हिडीओत ती धावत कबुतरांना उडवताना दिसते. त्याच ठिकाणी एक कोंबडीही दिसते. हुमा तिच्याशी थोडी मस्करी करत असतानाच कोंबडी अचानक तिच्यावर धावून येते. त्यामुळे हुमा घाबरून मागे पळते. हा प्रसंग पाहून अनेक चाहत्यांनी हसून हसून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हुमा म्हणाली, “या प्रवासातील माझी एक खास आठवण म्हणजे – कोंबडीने माझ्यावर हल्ला केला. ही चूक माझीच होती, कारण मी तिच्याच घरात तिच्याशी मस्ती करत होते.” तिने हा प्रसंग खूपच हलक्याफुलक्या पद्धतीने शेअर केला. या धावपळीत हुमा कुरेशीचा फोन देखील फुटला. तिने त्याचा फोटोही ‘Aftermath of Bhutan’ या कॅप्शनसह इंस्टा स्टोरीवर शेअर केला.
हुमा भूटानमध्ये तिचं पहिलं पुस्तक ‘Zeba: An Accidental Superhero’च्या प्रमोशनसाठी गेली होती. हे पुस्तक तिने प्रथमच भारताबाहेरील वाचकांसाठी नेलं. त्याचबरोबर तिचा नवीन सिनेमा ‘बयान’ लवकरच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होणार आहे.