बॉक्स ऑफिसनंतर ओटीटीचा ताबा घेणार 'वॉर-२', लवकरच होणार प्रदर्शित, कधी, कुठे पाहता येईल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 11:58 IST2025-08-18T11:54:49+5:302025-08-18T11:58:08+5:30

थिएटरनंतर आता ओटीटीवर असणार 'वॉर-२' चा ताबा, लवकरच होणार प्रदर्शित, कधी, कुठे पाहता येईल? जाणून घ्या

hritik roshan and jr ntr starrer war 2 ott release details know about when and where to watch | बॉक्स ऑफिसनंतर ओटीटीचा ताबा घेणार 'वॉर-२', लवकरच होणार प्रदर्शित, कधी, कुठे पाहता येईल? जाणून घ्या

बॉक्स ऑफिसनंतर ओटीटीचा ताबा घेणार 'वॉर-२', लवकरच होणार प्रदर्शित, कधी, कुठे पाहता येईल? जाणून घ्या

War 2 Ott Release: हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर स्टारर 'वॉर-२' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतो आहे.हा बहुचर्चित चित्रपट १४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला.या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणीचीही प्रमुख भूमिका आहे. अवघ्या चार दिवसांत चित्रपटाने १७० कोटींचा व्यवसाय केला आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाला सिनेरसिकांची पसंती मिळताना दिसतेय. एकीकडे बॉक्स ऑफिसवर चित्रपटाती चलती असताना आत प्रेक्षक  त्याच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

'वॉर-२' हा सिनेमा स्पाय युनिव्हर्सचा एक भाग आहे. बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशन आणि साऊथ सुपरस्टार ज्यूनिअर एनटीआरची जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकल्याने प्रेक्षक प्रचंड खुश आहेत. दरम्यान, 'वॉर-२' रिलीजनंतर त्याच्या ओटीटीवर प्रदर्शनाबाबत अनेक दावे करण्यात येत आहेत. बिझनेस टुडे आणि इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, वॉर-२ चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल, असं सांगण्यात येत आहे. साधारणपणे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर,तो OTT वर येण्यासाठी जवळपास २ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यानुसार हा चित्रपट दिवाळीच्या आसपास OTT वर रिलीज करण्यात येईल, असं म्हटलं जात आहे. दरम्यान, याबाबत निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

१४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या 'वॉर-२'चांगली सुरुवात झाली.स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होण्याचा या चित्रपटाला मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.४०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटाने जगभरात २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 

Web Title: hritik roshan and jr ntr starrer war 2 ott release details know about when and where to watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.