महाभारतमध्ये दीपिका बनणार द्रौपदी तर ऋतिक रोशन दिसणार या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 17:45 IST2019-12-24T17:33:42+5:302019-12-24T17:45:50+5:30
दीपिका पादुकोण लवकरच रुपेरी पडद्यावर द्रौपदीची भूमिका साकारताना दिसणार.

महाभारतमध्ये दीपिका बनणार द्रौपदी तर ऋतिक रोशन दिसणार या भूमिकेत
दीपिका पादुकोण लवकरच रुपेरी पडद्यावर द्रौपदीची भूमिका साकारताना दिसणार. नितेश तिवारी दिग्दर्शित हा सिनेमा तीन भागांमध्ये दिसणार आहे. महाभारतच्या सीरिजमध्येमध्ये ऋतिक रोशनसुद्धा दिसणार आहे. ऋतिक रोशन यात भगवान कृष्ण यांची भूमिका साकारणार आहे.
न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार या सिनेमाचा निर्माते मधू मंटेना ऋतिक रोशन याचा जवळचा मित्र आहे. त्यामुळे त्याला ऋतिकला या भूमिकेत पाहायचे होते. दीपिका पादुकोणसुद्धा या सिनेमाची एक निर्मिती असणार आहे. छपाक नंतर निर्माती म्हणून दीपिकाचा हा दुसरा सिनेमा असणार आहे. महाभारतावर आधारित हा चित्रपट दोन वा अधिक भागात प्रदर्शित होईल. चित्रपटाचा पहिला भाग 2021 साली दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणे अपेक्षित आहे.
महाभारत या महाकाव्यातून आपल्याला आयुष्य जगण्याचा धडा मिळाला. या चित्रपटाचा भाग होण्यास मी उत्सुक आहे, असे दीपिका एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती. यासंदर्भात मधू मंटेना म्हणाले की, आपण सर्वांनी महाभारत अनेका पाहिले, वाढले वा ऐकले आहे. पण महाभारतावर आधारित आमचा चित्रपट द्रौपदी या पात्राभोवती फिरणारा असेल. दीपिका एक गुणी अभिनेत्री आहे. अभिनयाच्या जोरावर चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे कसब तिच्यात आहे. ती नसती तर हा चित्रपट बनूच शकला नसता. सध्या दीपिका ‘छपाक’ आणि ‘८३’ या चित्रपटात बिझी आहे.