ज्यु. एनटीआरच्या वाढदिवशी हृतिक रोशन देणार खास गिफ्ट, 'या' तारखेला येणार 'वॉर २'चा टीझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 14:16 IST2025-05-16T14:14:38+5:302025-05-16T14:16:06+5:30

War 2 Teaser Update: ज्यु. एनटीआरच्या वाढदिवशी हृतिक रोशनच्या बहुचर्चित वॉर २ सिनेमाचा टीझर येणार आहे. जाणून घ्या याविषयी

Hrithik Roshan to give special gift on Jr. NTR's birthday War 2 teaser release date | ज्यु. एनटीआरच्या वाढदिवशी हृतिक रोशन देणार खास गिफ्ट, 'या' तारखेला येणार 'वॉर २'चा टीझर

ज्यु. एनटीआरच्या वाढदिवशी हृतिक रोशन देणार खास गिफ्ट, 'या' तारखेला येणार 'वॉर २'चा टीझर

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या (hrithik roshan) आगामी 'वॉर २' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'वॉर २'च्या (war 2) शूटिंगविषयीचे अपडेट समोर येत आहेत. आता ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत अशा  'वॉर २' सिनेमाची पहिली झलक कधी बघायला मिळणार, याविषयीचं उत्तर सापडलं आहे. ज्यु. एनटीआरच्या (jr ntr) वाढदिवशी  'वॉर २'  सिनेमाचा टीझर रिलीज होण्याची शक्यता आहे. स्वतः हृतिकने याविषयीची हिंट दिली आहे. जाणून घ्या

या तारखेला रिलीज होणार 'वॉर २'चा टीझर

 ज्यु. एनटीआरच्या वाढदिवशी हृतिक त्याला खास सरप्राइज देणार आहे. ते म्हणजे  'वॉर २'चा टीझर. याविषयीचे संकेत हृतिकने दिले आहेत. या सरप्राइजमध्ये जूनियर एनटीआरच्या 'वॉर २'मधील पात्राचा पहिला लूक, टीझर किंवा पोस्टर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'वॉर २'  सिनेमाच्या माध्यमातून ज्यु. एनटीआर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. २० मे रोजी ज्युनिअर एनटीआरचा वाढदिवस असतो, त्याच दिवशी 'वॉर २' सिनेमाचा पहिला टीझर चाहत्यांच्या भेटीला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

'वॉर २' सिनेमाविषयी

'वॉर २' हा २०१९ च्या 'वॉर' चित्रपटाचा सिक्वेल असून, यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील सहावा चित्रपट आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, ज्यु. एनटीआर आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केलं असून १४ ऑगस्ट २०२५ रोजी 'वॉर २' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी स्पेन, इटली, अबू धाबी आणि भारतातील विविध ठिकाणी शूटिंग करण्यात आले आहे. हृतिक आणि जूनियर एनटीआर यांच्यातील एक भव्य डान्स सिक्वेन्स मार्च २०२५ मध्ये मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये शूट करण्यात आला, ज्यामध्ये ५०० हून अधिक बॅकग्राउंड डान्सर्स सहभागी होते. आता 'वॉर २'चा टीझर पाहण्यासाठी प्रेक्षकांना २० मे पर्यंत वाट पाहावी लागेल.

Web Title: Hrithik Roshan to give special gift on Jr. NTR's birthday War 2 teaser release date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.