Video: भावा यापेक्षा आधीची चांगली होती...! हृतिक रोशनची गर्लफ्रेन्ड पाहून नेटकरी ‘शॉक्ड’, ‘बाप-लेक’ म्हणत केलं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 12:34 IST2022-10-01T12:34:05+5:302022-10-01T12:34:53+5:30
Hrithik Roshan Saba Azad Video: हृतिक व सबाला पोझ देताना पाहून लोकांनी त्यांना ट्रोल करायला गेली. अगदी बाप-लेकीची जोडी म्हणत, अनेकांनी दोघांची खिल्ली उडवली.

Video: भावा यापेक्षा आधीची चांगली होती...! हृतिक रोशनची गर्लफ्रेन्ड पाहून नेटकरी ‘शॉक्ड’, ‘बाप-लेक’ म्हणत केलं ट्रोल
हृतिक रोशन ( Hrithik Roshan ) सध्या ‘विक्रम वेधा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चर्चा त्याच्या लव्ह लाईफचीही आहे. होय, हृतिकची लव्ह लाईफ आता कुणापासूनही लपून राहिलेली नाही. सुजैन खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर आता हृतिकच्या आयुष्यात सबा आझादची (Saba Azad ) एन्ट्री झालीये. गेल्या काही महिन्यांपासून हृतिक व सबा यांच्या प्रेमाला नुसतं उधाण आलं आहे. दोघंही हातात हात घालून अनेकदा फिरताना दिसतात. काल हे कपल पुन्हा एकदा एकत्र दिसलं. त्यांनी मीडियाला एकत्र पोझ दिल्याही. याचा एक व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला. हा व्हिडीओ समोर आला आणि सोशल मीडिया युजर्स बिथरले.
हृतिक व सबाला पोझ देताना पाहून लोकांनी त्यांना ट्रोल करायला गेली. अगदी बाप-लेकीची जोडी म्हणत, अनेकांनी दोघांची खिल्ली उडवली.
हृतिक व सबा जुहूत स्पॉट झालेत. कॅज्युअर आऊटफिटमध्ये असलेल्या या कपलने पापाराझींना भरपूर पोझ दिल्यात. यावेळी हृतिक ऑल ब्लॅक लुकमध्ये होता तर सबा ब्ल्यू क्रॉप टॉप व जीन्समध्ये होती. कारकडे जात असताना पापाराझींनी हृतिकला पोझ देण्याची विनंती केली. हृतिकने सबालाही आवाज दिला. मग दोघांनी हसत हसत पोझ दिल्यात.
या दोघांच्या व्हिडीओवर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. यहीं मिली इसको, एच आर के साथ कितनी बुरी लग रहीं है, अशी कमेंट एका युजरने केली. बाप आणि लेक दिसत आहेत. हृतिक हे तुला काय झालंय? अशी कमेंट एका युजरने केली. अरे, मला वाटलं ही त्याची मुलगी असावी, अशी खोचक कमेंटही एका युजरने केली आहे. मी तुला हिच्यासोबत अजिबात पाहू शकत नाही. हृतिक तु हे काय केलंस? अशा शब्दांत एका युजरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. यापेक्षा तर कंगना चांगली होती, अशी कमेंटही एकाने केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून हृतिक सबाला डेट करतोय. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये दोघं पहिल्यांदा एकत्र दिसले होते. सबा आझाद एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. 1 नोव्हेंबर 1990 रोजी जन्मलेली आणि दिल्लीत लहानाची मोठी झालेल्या सबाने थिएटर आर्टिस्ट म्हणून अॅक्टिंग करिअरला सुरूवात केली. यानंतर ती चित्रपटांकडे वळली. 2008 साली ‘दिल कबड्डी’ या सिनेमातून तिचा डेब्यू झाला. यात ती राहुल बोससोबत स्क्रिन शेअर करताना दिसली होती. पण तिला ओळख दिली ती 2011 साली रिलीज ‘मुझसे फ्रेन्डशिप करोगे’ या सिनेमाने. यात तिच्या अपोझिट साकिब सलीम दिसला होता. त्याआधी सबाने अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलं आहे. 2021 साली म्हणजे गतवर्षी ती ‘फील्स लाइक इश्क’ या सिनेमात दिसली होती.