पहिल्यांदाच हृतिकने मोडला फिटनेस रूल; उत्साहाच्या भरात खाल्लं दोन बादल्या जंकफूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 13:49 IST2023-05-04T13:48:37+5:302023-05-04T13:49:15+5:30

Hrithik roshan: अभिनयासह फिटनेसला प्राधान्य देणाऱ्या हृतिकने धूम 2च्यावेळी चक्क त्याचा फिटनेस रुल ब्रेक केला होता.

hrithik roshan ordered two buckets of junk food after shooting for dhoom again song | पहिल्यांदाच हृतिकने मोडला फिटनेस रूल; उत्साहाच्या भरात खाल्लं दोन बादल्या जंकफूड

पहिल्यांदाच हृतिकने मोडला फिटनेस रूल; उत्साहाच्या भरात खाल्लं दोन बादल्या जंकफूड

'कहो ना प्यार है' या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. जबरदस्त फिटनेस, गुड लुकिंग या गुणांमुळे हृतिकने पहिल्याच सिनेमातून तरुणींच्या मनावर राज्य केलं. त्यामुळे चाहत्यांमध्ये कायम त्याची चर्चा रंगत असते. अभिनयासह फिटनेसला प्राधान्य देणाऱ्या हृतिकने एकदा चक्क त्याचा फिटनेस रुल ब्रेक केला होता. एका सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर त्याने चक्क २ बादल्या भरुन चॉकलेट आणि जंक फूड खाल्लं होतं. याविषयी त्यानेच खुलासा केला.

उत्तम अभिनय, फिटनेस यांच्यासोबत हृतिक आणखी एका गोष्टीमुळे ओळखला जातो. ती गोष्ट म्हणजे त्याची डान्स स्टाइल. हृतिकची डान्स स्टाइल कॉपी करणं अनेकांना शक्य नाही. त्यामुळे तो त्याच्या डान्समुळे कायम चर्चेत येतो. यामध्येच त्याचं  'धूम 2' मधील त्याचं ‘धूम अगेन’  हे गाणं तुफान गाजलं. परंतु,  या गाण्यासाठी हृतिकने प्रचंड मेहनत केली होती. इतकंच काय तर त्याने चॉकलेट्स ,जंकफूडदेखील खाणं टाळलं होतं. त्यामुळे हे गाणं पूर्ण झाल्यावर त्याने बादली भरुन जंकफूड खाल्लं होतं.

‘धूम अगेन’ हे गाणं आम्ही  सकाळी ९ वाजता सुरु केलं आणि दुसऱ्या दिवशी १०-११ पर्यंत न थांबता सलग त्याचं शूट केलं. कारण तेव्हा दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या रायला काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं. तिला फ्लाइट पकडायची होती. त्यामुळे आमच्याकडे फार वेळ नव्हता. मी सकाळी ९ वाजता नाचायला सुरुवात केली ते जवळ जवळ पुढच्या दिवशी सकाळी पॅकअप पर्यंत मी फक्त डान्सचं करत होतो. या गाण्यात माझं पिळदार शरीर आणखी उठून दिसायला हवं होतं. त्यामुळे मी अन्न,पाणी काहीही घेतलं नव्हतं”, असं हृतिक म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “सतत नाचून मी खूप थकलो होत त्यामुळे एनर्जीसाठी मी भरपूर चॉकलेट्स, जंकफूड मागवलं. कोणाचा विश्वास बसणार नाही पण या गाण्याच्या चित्रीकरणानंतर मी तब्बल २ बादल्याभरून चॉकलेट्स आणि जंक फूड खाल्लं होतं. एवढं बाहेरचं खाणं योग्य नाही हे मला ठावूक आहे. पण, ज्यादिवशी तुम्ही भरपूर मेहनत घेता तेव्हा सगळं काही माफ असतं.”

Web Title: hrithik roshan ordered two buckets of junk food after shooting for dhoom again song