'वॉर २'चा टीझर पाहून हृतिकच्या गर्लफ्रेंडची "बवाल" प्रतिक्रिया, तर EX पत्नी सुझैन खान म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:57 IST2025-05-20T16:56:51+5:302025-05-20T16:57:10+5:30
हृतिकची गर्लफ्रेंड आणि एक्स वाइफ सुजैन खानने 'वॉर २' पाहून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काय म्हणाल्या दोघी?

'वॉर २'चा टीझर पाहून हृतिकच्या गर्लफ्रेंडची "बवाल" प्रतिक्रिया, तर EX पत्नी सुझैन खान म्हणाली-
आज सकाळपासून सोशल मीडियावर एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे 'वॉर २'ची. हृतिक रोशनचा आगामी सिनेमा 'वॉर २'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून या टीझरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हृतिक रोशन आणि ज्यु. एनटीआर या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळतेय. टीझर रिलीज होताच हृतिकच्या चाहत्यांनी या टीझरचं खूप कौतुक केलंय. अशातच हृतिकच्या एक्स वाईफ सुझैन खान आणि त्याची सध्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांनी केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे
हृतिकची एक्स वाइफ आणि गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया
'वॉर २'चा टीझर पाहून हृतिक रोशनची एक्स वाइफ सुझैन खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. सुझैन म्हणाली, "काय कमाल टीझर आहे. हृतिक आणि ज्यु. एनटीआरने खरंच कमाल केली आहे". अशा मोजक्या शब्दात सुझैनने प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे हृतिकची सध्याची गर्लफ्रेंड सबा आझादने टीझर पाहून लिहिलंय की, "बवाल मचा दिया! टीझर तर खरंच धमाकेदार आहे. आता पूर्ण सिनेमा पाहण्यासाठी आणखी वाट बघवत नाही." अशा शब्दात हृतिकच्या 'वॉर २'चं दोघांनीही कौतुक केलंय.
कधी रिलीज होणार 'वॉर २'
'वॉर २' हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा सहावा भाग आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक रोशन, एन. टी. रामाराव जूनियर आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेली असून हृतिक रोशन पुन्हा एकदा मेजर कबीर धालीवालच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, अबू धाबी, काश्मीर आणि इटली येथे झाले आहे. 'वॉर २' हा सिनेमा १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सलमान-शाहरुख कॅमिओ करणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे.