"ही धोक्याची घंटा नाही तर...", 'धुरंधर २' पाहून भारावले राकेश रोशन, आदित्य धरचं तोंडभरुन कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 11:52 IST2026-03-21T11:51:58+5:302026-03-21T11:52:34+5:30

Rakesh roshan: राकेश रोशन यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत 'धुरंधर 2' विषयी त्यांचं मत मांडलं.

hrithik-roshan-father-rakesh-roshan-reviewed-dhurandhar-2-says-dont-take-it-as-a-risk | "ही धोक्याची घंटा नाही तर...", 'धुरंधर २' पाहून भारावले राकेश रोशन, आदित्य धरचं तोंडभरुन कौतुक

"ही धोक्याची घंटा नाही तर...", 'धुरंधर २' पाहून भारावले राकेश रोशन, आदित्य धरचं तोंडभरुन कौतुक

गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक ज्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते तो 'धुरंधर 2' (dhurandhar 2) हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत असून सर्व स्तरांमधून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत कलाविश्वातील अनेक बड्या मंडळींनी या सिनेमाविषयी त्यांचं मत मांडलं आहे. परंतु, या सगळ्यामध्ये अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता असलेल्या राकेश रोशन यांनी दिलेल्या रिव्ह्यूकडे लोकांचं लक्ष वेधलं आहे. राकेश रोशन (Rakesh roshan) यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत 'धुरंधर 2'  विषयी त्यांचं मत मांडलं. इतकंच नाही तर त्यांनी दिग्दर्शक आदित्य धर यांचंही तोंडभरुन कौतुक केलं आहे.

''धुरंधर 2' ' विषयी नेमकं काय म्हणाले राकेश रोशन

''मी नुकताच आदित्य धर यांचा ऐतिहासिक असा 'धुरंधर' हा सिनेमा पाहिला. हा सिनेमा म्हणजे आपल्या सगळ्या फिल्ममेकर्ससाठी एक चांगली शिकवण आहे. आपण सगळ्या फिल्ममेकर्सने आता कुठेतरी सिनेमाच्या चालत आलेल्या त्याच त्या जुन्या साच्याला कुठेतरी बदलायला हवं.आदित्यने ज्या दृष्टीकोनातून, ज्या ध्येयाने आणि आत्मविश्वासाने हा सिनेमा तयार केला आहे. हे पाहून त्याने सगळ्यांच्या अपेक्षांना मागे ठेवत उंच भरारी घेतली आहे'', असं राकेश रोशन म्हणाले.

पुढे ते म्हणतात, ''हा सिनेमा म्हणजे धोक्याची घंटा नाही. तर मनोरंजन आणि कथेला एका नव्या पद्धतीने आणि वेगळ्या धाटणीच्या अनुषंगाने पाहायला पाहिजे. या अशा सिनेमांची फार गरज होती. आणि, आदित्यने अपेक्षांपेक्षाही खूप मोठं, उत्तम काम केलं आहे. आदित्यला त्याच्या कार्यात यश मिळो.''

दरम्यान,  आदित्य धर यांच्या 'धुरंधर 2' मध्ये रणवीर सिंह, संजय दत्त, राकेश बेदी, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. या सिनेमाने पहिल्याच दिवशी १०२ कोटींचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ७८ कोटींचा टप्पा गाठला. त्यामुळे अवघ्या दोन दिवसात या सिनेमाने प्री रिलीज कलेक्शनसोबतच २२० कोटींची कमाई केली आहे.

Web Title : राकेश रोशन ने 'धुरंधर 2' की प्रशंसा की, फिल्म निर्माताओं के लिए बताया सबक

Web Summary : राकेश रोशन ने आदित्य धर की 'धुरंधर 2' की सराहना करते हुए इसे फिल्म निर्माताओं के लिए एक सबक बताया, फिल्म निर्माताओं से पुराने ढर्रे से बाहर निकलने का आग्रह किया। उन्होंने धर की दृष्टि और आत्मविश्वास की प्रशंसा की, फिल्म की सफलता और नवीन कहानी कहने पर ध्यान दिया। फिल्म में रणवीर सिंह हैं और इसने दो दिनों में ₹220 करोड़ की कमाई की है।

Web Title : Rakesh Roshan praises 'Dhurandhar 2,' calls it a lesson for filmmakers.

Web Summary : Rakesh Roshan lauded Aditya Dhar's 'Dhurandhar 2' as a cinematic lesson, urging filmmakers to break from old molds. He praised Dhar's vision and confidence, noting the film's success and innovative storytelling. The movie stars Ranveer Singh and has grossed ₹220 crore in two days.