गरोदरपणाच्या काळात कतरिनाची अवस्था कशी होती? विकी कौशल म्हणाला- "तिने ज्या हिंमतीने..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 13:33 IST2026-02-24T13:31:56+5:302026-02-24T13:33:29+5:30
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता विकी कौशल सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आई-बाबा झाले.

गरोदरपणाच्या काळात कतरिनाची अवस्था कशी होती? विकी कौशल म्हणाला- "तिने ज्या हिंमतीने..."
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता विकी कौशल सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आई-बाबा झाले. आता विकीने एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान कतरिनाचे तोंडभरून कौतुक केले असून, गरोदरपणात तिने स्वतःला कसं सांभाळलं, याचा खुलासा केलाय. काय म्हणाला विकी?
काय म्हणाला विकी कौशल?
नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या 'द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया'च्या पुरस्कार सोहळ्यात विकीने हजेरी लावली होती. यावेळी त्याची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री नेहा धुपियाने त्याला "बाबा झाल्यावर आता कसं वाटतंय?" असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना विकी म्हणाला, "बाबा म्हणून खूप छान वाटतंय. माझा मुलगा विहान आता तीन महिन्यांचा आहे. खरं तर, बाळ इतकं लहान असताना वडिलांकडे करण्यासारखं फार कमी असतं. मी सध्या फक्त आई आणि बाळासाठी एक 'चीअरलीडर' म्हणून काम करतोय. तो थोडा मोठा झाला की मग मी अधिक योगदान देऊ शकेन."
कतरिनाबद्दल बोलताना विकी म्हणाला, "सध्या कतरिना खऱ्या अर्थाने एक सुपरहिरो आहे. गरोदरपणाचा काळ तिने ज्या हिमतीने सांभाळला आणि आता ती ज्या प्रकारे मातृत्वाची जबाबदारी पार पाडतेय, ते पाहून मला तिचा प्रचंड अभिमान वाटतो. ती एक खरी 'योद्धा' आहे आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे."
विहान कौशलचे आगमन
विकी आणि कतरिनाने २१ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या मुलाचे स्वागत केले होते. त्यानंतर ७ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलाचं नाव 'विहान कौशल' असल्याचे जाहीर केले. विकी कौशलचा 'छावा' हा ऐतिहासिक चित्रपट नुकताच सुपरहिट ठरला असून त्याने जगभरात ८०७ कोटींची कमाई केली आहे. तो लवकरच संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.