Javed Akhtar : जावेद अख्तर यांनी कशी घेतली पंडित नेहरुंची भेट, सांगितला तो भन्नाट किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 17:20 IST2023-01-17T17:18:47+5:302023-01-17T17:20:11+5:30

बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचा आज वाढदिवस. ते आज 78 वर्षांचे झाले आहेत

How Javed Akhtar met Pandit jawaharlal Nehru told story behind it in a recent interview | Javed Akhtar : जावेद अख्तर यांनी कशी घेतली पंडित नेहरुंची भेट, सांगितला तो भन्नाट किस्सा

Javed Akhtar : जावेद अख्तर यांनी कशी घेतली पंडित नेहरुंची भेट, सांगितला तो भन्नाट किस्सा

Javed Akhtar :  बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचा आज वाढदिवस. जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या कवितांचे, गाण्यांचे अनेक जण चाहते आहेत. मात्र जावेद अख्तर हे देखील एका व्यक्तीचे खूप मोठे चाहते होते ज्यांच्यासाठी त्यांनी गाडीवर उडी मारली आहे. लल्लंनटॉपला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. 

शाळेत असताना जावेद अख्तर यांनी पंडित नेहरुंची धावतपळत जाऊन स्वाक्षरी घेतली होती. हा किस्सा सांगताना ते म्हणाले, 'मी अलिगढ मधील शाळेत शिकत होतो. १३ वर्षांचा होतो. तेव्हा शाळेतील लायब्ररीच्या उद्घाटनासाठी पंडिॉत नेहरु येणार होते. या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही बोलावण्यात आलं होतं. कार्यकर्मात आमचा ग्रुप गाणं म्हणणार होता त्यामुळे मी साहजिकच स्टेजजवळच होतो. '

ते पुढे म्हणाले, 'जसा कार्यक्रम संपला पंडित नेहरु गाडीकडे जाण्यास निघाले. मी लगेच त्यांच्यामागे धावलो. माझ्या मैत्रिणीने एका कागदावर पंडित नेहरुंचे चित्र काढले होते त्यावर तिरंगा होता. त्यांची गाडी निघणार तोच मी गाडीकडे झेप घेतली आणि ते बसले होते त्या खिडकीतून माझा कागद पुढे केला. त्यांनी लगेच पेन काढून कागदावर स्वाक्षरी केली.

जावेद अख्तर आज 78 वर्षांचे झाले आहेत. नुकतेच त्यांच्या आयुष्यावर लिहिलेले 'जादुनामा' या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत पार पडले. अरविंद मंडलोई यांनी हे पुस्तक लिहिले आहे. यावेळी जावेद अख्तर यांचे मित्र आणि ज्येष्ठ गीतकार गुलजार यांची उपस्थिती होती.

Web Title: How Javed Akhtar met Pandit jawaharlal Nehru told story behind it in a recent interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.