'हाऊसफुल ५' ओटीटीवर कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर अपडेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 15:57 IST2025-06-01T15:55:51+5:302025-06-01T15:57:02+5:30

'हाऊसफुल ५' ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी आणि कुठे पाहता येईल, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. याबद्दल जाणून घ्या. 

Housefull 5 Ott Streaming Details Where To Watch Akshay Kumar & Riteish Deshmukh’s Killer Comedy After Theatrical Run | 'हाऊसफुल ५' ओटीटीवर कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर अपडेट!

'हाऊसफुल ५' ओटीटीवर कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर अपडेट!

Housefull 5 Ott Streaming Details: सध्या एक चित्रपट चर्चेत आहे, तो म्हणजे 'हाऊसफुल ५'.  या चित्रपटाचा ट्रेलर  आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. आता प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक झालेत. येत्या ६ जून रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत.  थिएटरनंतर हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी आणि कुठे पाहता येईल, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. याबद्दल जाणून घ्या. 

थिएटरमधील प्रदर्शनानंतर, 'हाऊसफुल 5' अमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होईल. तथापि, ओटीटी रिलीजची अचूक तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण सामान्यतः चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर 6 ते 8 आठवड्यांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतो, त्यामुळे प्रेक्षकांना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहता येईल अशी अपेक्षा आहे. 

'हाऊसफुल ५' या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली असून तरुण मनसुखानी यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या टीझरला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने 'UA 16+' रेटिंग दिले आहे. या सिनेमात तगडी स्टारकास्ट आहे. यात अक्षय कुमार,अभिषेक बच्चन ,जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त ,नर्गिस फाखरी, फरदीन खान, जॅकी श्रॉफ हे कलाकार आहेत. तर मराठमोळे नाना पाटेकर, रितेश देशमुख आणि श्रेयस तळपदे हे कलाकारही आहेत.  कोणते कलाकार कोणत्या भूमिकात दिसणार आणि ते एकत्र कसे येणार, हे पाहण्याची प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.


याआधी हाऊसफुल फ्रँचायझीचे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. चारही चित्रपटांनी धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक चित्रपटाने प्रेक्षकांचे मोठे मनोरंजन केले. त्यामुळे 'हाऊसफुल ५'ची गोष्ट पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.  चित्रपटाचे बजेट ३७५ कोटी रुपये आहे.  आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 
 

Web Title: Housefull 5 Ott Streaming Details Where To Watch Akshay Kumar & Riteish Deshmukh’s Killer Comedy After Theatrical Run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.