Housefull 5 Box Office: 'हाऊसफुल' प्रतिसाद! अक्षय कुमार-नाना पाटेकर यांचा सिनेमा लवकरच १०० कोटी क्लबमध्ये जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 11:38 IST2025-06-09T11:37:54+5:302025-06-09T11:38:14+5:30

'हाऊसफुल ५' सिनेमाने वीकेंडला चांगली कमाई केली आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा १०० कोटी क्लबमध्ये दाखल होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे

Housefull 5 Box Office report day 3 akshay kumar nana patekar riteish deshmukh | Housefull 5 Box Office: 'हाऊसफुल' प्रतिसाद! अक्षय कुमार-नाना पाटेकर यांचा सिनेमा लवकरच १०० कोटी क्लबमध्ये जाणार?

Housefull 5 Box Office: 'हाऊसफुल' प्रतिसाद! अक्षय कुमार-नाना पाटेकर यांचा सिनेमा लवकरच १०० कोटी क्लबमध्ये जाणार?

अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'हाऊसफुल ५' सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात दिग्गज कलाकारांची फौज आहे. अक्षय कुमारसोबत नाना पाटेकर,  फरदीन खान, रितेश देशमुख, जॉनी लिव्हर, संजय दत्त, जॅकी श्रॉफ या कलाकारांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे.  'हाऊसफुल ५' सुरुवातीपासून चांगलाच चर्चेत होता. याचाच फायदा सिनेमाला झालेला दिसतोय.  'हाऊसफुल ५' सिनेमाने वीकेंडला बक्कळ कमाई केली आहे. जाणून घ्या.

'हाऊसफुल ५' सिनेमाची बॉक्स ऑफिस कमाई

'हाऊसफुल ५' सिनेमाचे पहिल्या दिवशी २४.३५ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत वाढ झाली. या सिनेमाने दुसऱ्या ३२.३८ कोटींची कमाई केली. याशिवाय तिसऱ्या दिवशी रविवारी सिनेमाने ३१.०५ कोटींची कमाई केली. अशाप्रकारे 'हाऊसफुल ५' सिनेमाने तीन दिवसात तब्बल ८८.२३ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात 'हाऊसफुल ५' सिनेमा १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल होईल, अशी शक्यता नाकारता येत नाही. एकूणच या सिनेमाला प्रेक्षकांचा हाउसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे.

'हाऊसफुल ५' सिनेमाविषयी

साजिद नाडियादवाला निर्मिती 'हाऊसफुल ५' सिनेमा ६ जून २०२५ ला रिलीज झाला. हा सिनेमा 'हाऊसफुल' या गाजलेल्या फ्रँचायजीचा पाचवा भाग आहे. आधीच्या चारही भागांना प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालं. त्यामुळे 'हाऊसफुल ५' पाहण्यासाठी प्रेक्षकांची चांगलीच गर्दी दिसतेय. या सिनेमात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडीस, नर्गीस फाखरी, जॉनी लिव्हर, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, श्रेयस तळपदे अशा एकापेक्षा एक दिग्गज कलाकारांची फौज आहे. विशेष म्हणजे नाना पाटेकर या सिनेमा खास भूमिकेत दिसत आहेत.

Web Title: Housefull 5 Box Office report day 3 akshay kumar nana patekar riteish deshmukh