Housefull 5: मंडे टेस्टमध्ये पास, ४ दिवसांत १०० कोटी पार! 'हाऊसफुल ५' सिनेमाचे बॉक्स ऑफिस आकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:47 IST2025-06-10T10:47:01+5:302025-06-10T10:47:42+5:30

Housefull 5: रितेश, अभिषेक अन् अक्षयचा सिनेमा 'हाऊसफुल'! ४ दिवसांत पार केले १०० कोटी

housefull 5 box office collection day 4 ritesh deshmukh akshay kumar movie crossed 100cr | Housefull 5: मंडे टेस्टमध्ये पास, ४ दिवसांत १०० कोटी पार! 'हाऊसफुल ५' सिनेमाचे बॉक्स ऑफिस आकडे

Housefull 5: मंडे टेस्टमध्ये पास, ४ दिवसांत १०० कोटी पार! 'हाऊसफुल ५' सिनेमाचे बॉक्स ऑफिस आकडे

कॉमेडीचा थरार मांडणारा आणि तगडी स्टारकास्ट असलेला 'हाऊसफुल ५' हा सिनेमा शुक्रवारी(६ जून) सर्वत्र प्रदर्शित झाला. 'हाऊसफुल' फ्रॅन्चायझीच्या या पुढच्या भागाची चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. ट्रेलरपासूनच या सिनेमाची चाहते वाट पाहत होते. सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता 'हाऊसफुल ५'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. 

पहिल्याच दिवशी 'हाऊसफुल ५' सिनेमाने २४ कोटींचा गल्ला जमवला. त्यानंतर वीकेंडला सिनेमाच्या कमाईत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. शनिवारी सिनेमाने ३१ कोटी कमावले तर रविवारी ३२.५ कोटी इतकी कमाई केली. 'हाऊसफुल ५' मंडे टेस्टमध्येही पास झाला आहे. इतर दिवसांच्या तुलनेत सोमवारी सिनेमाने कमी कमाई केली. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, सोमवारी १३.७६ कोटींचा गल्ला 'हाऊसफुल ५' ने जमवला आहे. आत्तापर्यंत ४ दिवसांत 'हाऊसफुल ५'ने १०१.४६ कोटींची कमाई केली आहे. 

'हाऊसफुल ५' सिनेमात तगडी स्टारकास्ट आहे. या सिनेमात अक्षय कुमार, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, सोनम बजावा, नरगिस फाकरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चित्रगंदा सिंह, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, रंजीत, सौंदर्या शर्मा, निकितिन धीर आणि आकाशदीप साबिर हे कलाकारही आहेत. 

Web Title: housefull 5 box office collection day 4 ritesh deshmukh akshay kumar movie crossed 100cr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.