Housefull 5 हिट होईल की फ्लॉप? बॉक्स ऑफिसवर कमावले तब्बल 'एवढे' कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 10:13 IST2025-06-08T10:09:28+5:302025-06-08T10:13:03+5:30

'हाऊसफुल ५'ने बॉक्स ऑफिसवर कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

Housefull 5 Box Office Collection Akshay Kumar's Movie Crosses 50 Crore Know The Total Collection | Housefull 5 हिट होईल की फ्लॉप? बॉक्स ऑफिसवर कमावले तब्बल 'एवढे' कोटी!

Housefull 5 हिट होईल की फ्लॉप? बॉक्स ऑफिसवर कमावले तब्बल 'एवढे' कोटी!

'हाऊसफुल ५'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय आणि अवघ्या तीन दिवसांत कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरत असल्याचे दिसून येत आहे आणि केवळ तीन दिवसांत त्याच्या बजेटचा मोठा भाग वसूल करून निर्मात्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

तरुण मनसुखानी दिग्दर्शित 'हाऊसफुल ५' या विनोदी चित्रपटात जबरदस्त स्टारकास्ट आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, नर्गिस फाखरी, जॅकलिन फर्नांडिस, नाना पाटेकर, फरदीन खान, जॉनी लिव्हर, चंकी पांडे यांच्या भूमिका आहेत.

'हाऊसफुल ५' ने तिसऱ्या दिवशी किती कमाई केली

'हाऊसफुल ५'नं पहिल्या दिवशी चित्रपटाने २४ कोटी रुपये कलेक्शन केलं. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने मोठी कमाई केली आणि ३० कोटी रुपये कमावले. 'सॅकनिल्क'च्या अहवालानुसार, चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी ०.०४ कोटी कलेक्शन केले. हे सुरुवातीचे आकडे आहेत आणि ते आणखी वाढतील. अंतिम आकडे संध्याकाळपर्यंत जाहीर होतील. चित्रपटाची एकूण कमाई ५४.०४ कोटी झाली आहे. दरम्यान, या फ्रँचायझीच्या शेवटच्या ४ चित्रपटांच्या रेकॉर्डवरून हा पाचवा भाग हिट होईल असे दिसून येत आहे.


'हाऊसफुल ५' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १- २४ कोटी रुपये

'हाऊसफुल ५' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस २- ३० कोटी रुपये

'हाऊसफुल ५'बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ३- ०.०४ कोटी रुपये

नेट कलेक्शन- ५४.०४ कोटी रुपये

'हाऊसफुल ५' चित्रपटाचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे, दोन क्लायमॅक्स. 'हाऊसफुल ५' चित्रपटाचे दोन वेगवेगळे शेवट आहेत. याचा अर्थ असा की प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट दोनदा पाहावा लागेल, जेणेकरून ते दोन्ही क्लायमॅक्स पाहू शकतील. याबद्दल एएनआयशी बोलताना तरुण मनसुखानी म्हणाले, की साजिद नाडियाडवाला यांना ही कल्पना ३० वर्षांपासून होती. शेवटी त्यांनी ती 'हाऊसफुल ५' मध्ये आणली. दिग्दर्शक म्हणून दोन क्लायमॅक्स असलेला चित्रपट बनवणे माझ्यासाठी सर्वात मनोरंजक होते. त्यावेळी हे सर्व खूप रोमांचक वाटते आणि एक चित्रपट निर्माता म्हणून तुम्हाला ते अधिक चांगले बनवण्याचे आव्हान वाटते. पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात सेटवर जाता आणि काम सुरू करता तेव्हा तुम्हाला खऱ्या आव्हानांची जाणीव होते.

Web Title: Housefull 5 Box Office Collection Akshay Kumar's Movie Crosses 50 Crore Know The Total Collection