न्यासा देवगणच्या बोल्ड ट्रान्सफॉर्मेशनवर काजोलने दिलं उत्तर; म्हणाली, "माझी मुलगी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 20:37 IST2023-03-28T20:36:57+5:302023-03-28T20:37:58+5:30

काजोलच्या अशा उत्तराने अनेक चाहत्यांच्या भुवया उंचावल्या...

hot kajol shocking reaction on daughter Nysa Devgan bold transformation says she is enjoying | न्यासा देवगणच्या बोल्ड ट्रान्सफॉर्मेशनवर काजोलने दिलं उत्तर; म्हणाली, "माझी मुलगी..."

न्यासा देवगणच्या बोल्ड ट्रान्सफॉर्मेशनवर काजोलने दिलं उत्तर; म्हणाली, "माझी मुलगी..."

Nysa Devgan Kajol: अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगण तिच्या बोल्ड ट्रान्सफॉर्मेशनमुळे सतत चर्चेत असते. न्यासा कधी सोशल मीडियावर फोटो शेअर करते तर कधी तिच्या मित्रांसोबत पार्टी करताना स्पॉट होते. या फोटोंमध्ये, न्यासा देवगनचे कपडे आणि तिच्या सुपर-हॉट फिगरकडे चाहत्यांचे लक्ष गेलं नाही तरच नवल. अलीकडेच न्यासाची आई बॉलीवूड अभिनेत्री काजोलने मुलगी न्यासाच्या या बोल्ड ट्रान्सफॉर्मेशबद्दल खुलेपणाने आपलं मत मांडलं. या दरम्यान काजोल असं काही बोलली की तिचे वक्तव्य ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

काजोलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत न्यासाबद्दल अनेक सिक्रेट गोष्टी सांगितल्या. काजोलला मुलाखतीत विचारण्यात आले होते की, तिला न्यासाची लोकप्रियता कशी वाटते? या प्रश्नाचे उत्तर देताना काजोल म्हणाली- 'मला तिचा अभिमान वाटतो. ती कुठेही गेली तरी ती स्वत:ला अतिशय सन्मानाने लोकांसमोर आणि चाहत्यांसमोर प्रेझेन्ट करते याचा मला नक्कीच अभिमान आहे.' न्यासाच्या बोल्ड ट्रान्सफॉर्मेशनबद्दलही काजोलला विचारण्यात आले. त्यावर एचटीच्या मुलाखतीत काजोलने दिलेल्या उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या. "मला सध्या तरी इतकंच सांगावंसं वाटतं की न्यासा आता फक्त 19 वर्षांची आहे आणि ती तिचे आयुष्य तिच्या मर्जीनुसार, एन्जॉय करत आहे. ती सध्या तिच्या वयात असलेल्या मुलांप्रमाणे मजा करत आहे. तिच्या वयातील सर्वच मुला-मुलींनी आयुष्य एन्जॉय करायलाच हवं. मी न्यासाला कायम सपोर्ट करत राहिन," असे काजोल स्पष्टपणे म्हणाली.

दरम्यान, काजोल आणि अजयच्या मुलीने सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. एवढेच नाही तर तिचा एअरपोर्ट लुक आणि पार्टीचे फोटो काही मिनिटांत व्हायरल होतात. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की न्यासाची लोकप्रियता किती वाढली आहे. यासोबतच तिचे बोल्ड ट्रान्सफॉर्मेशन हा देखील गेल्या काही काळापासून चर्चेतला विषय आहे. विशेष म्हणजे न्यासाचा फॅशन सेन्स, रिव्हीलिंग कपडे आणि तितकाच बोल्ड अँटिट्यूड यामुळे तिच्यावर चाहत्यांचा नजरा खिळून राहतात.

Web Title: hot kajol shocking reaction on daughter Nysa Devgan bold transformation says she is enjoying