हनी सिंग आणि नुशरत भरुचा लॉस अँजेलिसच्या रस्त्यावर दिसले फिरताना, फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 18:10 IST2023-06-14T18:09:43+5:302023-06-14T18:10:05+5:30
Nushrat Bharucha And Honey Singh : अभिनेत्री नुसरत भरुचा आणि हनी सिंग ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे.

हनी सिंग आणि नुशरत भरुचा लॉस अँजेलिसच्या रस्त्यावर दिसले फिरताना, फोटो आले समोर
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा आणि हनी सिंग या जोडीला आपण मोठ्या पडद्यावर अनेकदा एकत्र पाहिले आहे. हनी सिंगचा रॅप आणि नुसरतचा डान्स हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. 'सैयां जी', 'दिल चोरी', 'केअर नी कारदा' आणि 'छोटे छोटे पेग' यांसारख्या चार्टबस्टर्सनंतर, ही जोडी पुन्हा एकत्र आली. नुसरत भरुचा आणि यो यो हनी सिंग सहाव्यांदा एकत्र येत आहेत.
सध्या बॉलिवूडमध्ये नुसरत भरुचा आणि हनी सिंग यांच्या प्रेमाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या दोघांचे लॉस अँजेलिसमधील छायाचित्रे चर्चेत आहेत. दोघेही एकमेकांसोबत खूपच कम्फर्टेबल दिसत आहेत. फोटोमध्ये नुसरत आणि हनीसोबत त्याचे दोन मित्रही दिसत आहेत. 'प्यार का पंचनामा' फ्रेंचाइजी, 'सोनू के टीटू की स्वीटी' आणि 'छलांग' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली नुसरत शूटिंगदरम्यान तिच्या रूमर्ड बॉयफ्रेंडसोबत वेळ घालवताना आणि शॉपिंग करताना दिसली.
अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती विशाल फुरियाच्या 'छोरी २' मध्ये दिसणार आहे. यासोबतच तिचा 'अकेली' हा आणखी एक चित्रपटही चर्चेत आहे.